चित्र-चरित्र

क्रांती रेडकर
क्रांती रेडकर
अभिनेत्री
१७ ऑगस्ट १९८२

क्रांतीचा जन्म मुंबईचा आणि ती वाढली मुंबईत. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिनं एका छोट्या नाटुकल्यात मदर तेरेसा यांची भूमिका साकारली होती. २००० मध्ये ‘सून असावी अशी’ या चित्रपटाद्वारे तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अंकुश चौधरी या चित्रपटाचा नायक होता. केदार शिंदे यांच्या ‘जत्रा’ चित्रपटामधील ‘कोंबळी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला मोठी लोकप्रियता मिळाली. ‘फक्त लढ म्हणा’, ‘शहाणपण देगा देवा’, ‘ऑन ड्युटी २४ तास’, ‘पिपाणी’, ‘खो खो’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘कुणी घर देता का घर’, ‘करार’ हे तिचे उल्लेखनीय चित्रपट. ‘कांकण’ या चित्रपटाचे तिने दिग्दर्शनही केले होते. प्रकाश झा यांच्या ‘गंगाजल’ चित्रपटामध्ये तिने छोटी व्यक्तिरेखा साकारली होती. तसेच ‘चित्तोड की महारानी’ आणि ‘सिम्प्ली सपने’ या मालिकांमध्येही ती झळकली होती.

ट्रकभर स्वप्न (२०१८), बाळा (२०१९), रॉकी (२०१९) हे क्रांती रेडकर यांचे अलीकडचे चित्रपट आहेत. रंपाट (२०१९), मेनका ऊर्वशी (२०१९) हे प्रिया बेर्डे यांचे अलीकडचे चित्रपट आहेत. २०२१ मध्ये त्यांनी एका निर्मितीचीही निर्मिती केली होती.

-मंदार जोशी



चित्र-चरित्र