चित्र-चरित्र

विजय तेंडुलकर
विजय तेंडुलकर
पटकथाकार
६ जानेवारी १९२८ --- १९ मे २००८

विजय तेंडुलकर : श्रेष्ठ नाटककार, महान पटकथाकार

१९ मे विजय तेंडुलकर यांचा १०वा स्मृति दिन! दहा वर्षापूर्वी पुण्याच्या प्रयाग हॉस्पिटलमधे तेंडुलकर हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनानंतर दुसर्या दिवशीच्या वृत्तपत्रांत नाटककार तेंडुलकरांचे निधन अश्या बातम्या आल्या. वास्तविक नाटकाहून जास्त सकस पटकथालेखन तेंडुलकरांनी केले होते. सामना, सिंहासन, उंबरठा हे मराठी आणि बेनेगलांचा मंथन, गोविंद निहलानींचे आक्रोश, अर्धसत्य, आणि आघात हे हिंदी चित्रपट लक्षात घेतले तर तेंडुलकरांनी पटकथा लेखनाने आपल्या नाट्यकृतीवरही मात केली होती. हे जाणकार रसिकांच्या लगेच ध्यानांत येईल. पण वर्तमानपत्रांनी तश्याच नाटककार म्हणून बातमीत उल्लेख केला याचे कारण तेंडुलकारंची गिधाडे. सखाराम बाइर्डर आणि घाशिराम कोतवाल अश्लील म्हणून गाजली होती. नाटकवेड्या महाराष्ट्राने तेंडुलकराना स्वाभाविकच नाटककार हेच बिरुद लावले आणि त्यांच्या पटकथालेकनाकडे अनुल्लेखाने पाहिले.

तेंडुलकारांचे चित्रपट लेखन आणखी एका ठिकाणी लक्षात घेतले गेले नव्हते. ते म्हणजे आविष्कार ही अरविंद देशपांडेंची प्रायोगिक नाट्यसंस्था दरवर्षी कै. अरविंद देशपांडे स्मृतिमहोत्सव साजरा करायचीय एका वर्षी 'आविष्कार’ने त्यासाठी तेंडुलकर नाट्यमहोत्सव आयोजित करायचे ठरविले. सल्लागार समितीत कमलाकर सोनटक्के होते. ते म्हणाले 'नाटकांबरोबरच तेंडुलकरांनी उत्कृष्ट पटकथा लेखनही केले आहे. लेखक म्हणून त्३ाांच्३ाा नाट्यमहोत्सवाबरोबरच तेंडुलकरांनी लिहीलेल्या चित्रपटांचा महोत्सवही करायला हवा.

अरुण काकडे आविष्कारचे व्यवस्थापक ते म्हणाले 'चित्रपट महोत्सव कसा आयोजित करायचा हे आविष्कारला माहीत नाही.’ कमलाकर सोनटक्के म्हणाले, 'त्यासाठी तुम्ही प्रभात चित्र मंडळाचे सहकार्य घ्या.

तेव्हा आयोजित समितीत तेंडुलकर लिखीत नाटके आणि चित्रपट असे दोन्ही महोत्सव आयोजित करायचे ठरले. दुसरया दिवशी प्रभातचा सेक्रेटरी म्हणून सुलभा देशपांडेंचा मला फोन आला. आविष्कारच्या सहकार्याने प्रभातने तेंडुलकर लिखित चित्रपटांचा आम्ही महोत्सव करायचे ठरविले. 'आविष्कार’ ही नाट्यसंस्था अरविंद देशपांडेनीच स्थापन केलेली. त्यामुळे नाट्यमहोत्सव आधी रविंद्र नाट्य मंदिर मधे झाला. आणि नंतर चित्रपट महोत्सव साहित्य संघ मंदिरमधे प्रभातने भरविला. प्रमुख पाहुणे श्याम बेनेगल होते, उद्घाटनाचा चित्रपट शांतता कोर्ट चालू आहे.

येथेही तोच प्रकार! कार्यक्रम ठीक ६.३० वा सुरु झाला.तेंडुलकर श्याम बेनेगल मंचावर स्थानापन्न झाले. पण थिएटर अर्धेच भरलेले तेंडुलकरांचे सारे नाटकवाले चहाते आलेले होते. पण बाहेर लोक उभे होते. नाट्यमहोत्सवांत जेव्हा तेंडुलकरांचा सत्कार करण्३ाात आला तेव्हा सारे नाट्यगृह तुडुंब भरलेले होते. पण साहित्त्य संघ मंदिरात त्याच तेंडुलकरांच्या सत्काराला श्याम बेनेगल असूनही फक्त अर्धे नाट्यगृह भरलेले होते.

हे पाहून अरुण काकडे बाहेर उभ्या असलेल्या लोकांना म्हणाले 'आत बसा! बेनेगलांच्या हस्ते तेंडुलकरांचा सत्कार होतोय’. उत्तर आले 'सत्कार होऊ द्या तो संपला की चित्रपट पहायला बसतो.’ एकाच माणसांबद्दल नाटक लिहlल्याबद्द्ल आदर आणि चित्रपटाबद्दल अवहेलना हे पाहून मला आश्चर्यच वाटले. एकूणच नाटकवेड्या महाराष्ट्राने आणि तेंडुलकर प्रेमी नाटक वाल्यानीही तेंडुलकरांच्या चित्रपट लेखन गांभीर्याने घेतले नाही. हे उघड आहे. महाराष्ट्रनेच जर तेंडुलकरांच्या चित्रपटकथा लेखनाची दखल घेतली नाही तर उर्वरीत हिन्दुस्थान कशाला घेईल? तेंडुलकर नेहमी म्हणायचे नाटक लिहिताना पैसे कमवायचे हा विचार नव्हता. चित्रपट लिहतांना मात्र धन मिळवायचे एवढाच हेतू होता. तेंडुलकरांचा हा विनय म्हटला पाहिजे. तेंडुलकरांनी चित्रपटांचा सूक्ष्मतेने अभ्यास केला होता. 'प्रभात’चे चित्रपट प्रकाशित झाले त्या काळात तेंडुलकर शाळकरी विद्यार्थी होते. पण माणूस, कुंकू, तुकाराम, ज्ञानेश्वर हे चित्रपट त्यांनी माध्यमाची आवड आणि ओढ आहे म्हणूनच पाहिले. हे त्यांनीच मला एकदा सांगितले. इतकेच नव्हे तर पुढे प्रभातच्या चित्रपटांच्या डिव्हीडी आल्या तेव्हा सर्व अभिजात चित्रपटांच्या डीव्हीडींचा संचच त्यांनी खरेदी केला. १९६२ साली तेंडुलकर रविवारच्या पुरवणीचे संपादक म्हणून आचार्य अत्रे यांच्याआ 'मराठा’ दैनिकात आले. मी तेव्हा तिथे सिनेमाचा कॉलम लिहित होतो. त्यामुळे तेंडुलकरांशी खूप गप्पा सिनेमावरच व्हायच्या. १९६४ साली 'फिल्म फोरम’ही फिल्म सोसायटी सुरु झाली. तेव्हा 'फिल्म फोरम’चे खेळ वरळीच्या रमनोर्ड ल्याबोरेटरीत व्हायचे. रमनोर्डच्या मागच्या रस्त्यावरच 'मराठा’चे कार्यालय होते. मी सदस्य असल्याने खेळाला गेलो. माझ्या नंतर तेंडुलकर आले आणि स्वत: सभासदत्वाचा फॉर्म भरून सभासद झाले. रशियन दिग्दर्शक चुखरायचा गाजलेला 'क्लीअर स्काय’’ हा चित्रपट होता. खेळ सुटल्यावर ते मला भेटले तेव्हा म्हणाले 'मला काय ठाऊक तुम्ही पण इकडेच येणार आहात.’ तो रशियन चित्रपट पाहून मी तर मंत्र मुग्धच झालो होते. तेंडुलकरही त्याच मनोवस्थेत होते. बस स्टापवर बस येईपर्यंत तेंडुलकर चित्रपटाविषयी बोलत होते.

'मराठा’त इंग्रजी सिनेमावर मी साप्ताहिक कॉलम लिहायला सुरवात केली. एके दिवशी तेंडुलकर मला म्हणाले 'काय हो तुमचा कॉलम मी लिहीला तर चालेल का?’ अवश्य! मी उत्तरलो. पुढच्या आठवड्यापासून इंग्रजी चित्रपटांच्या प्रेस शोची निमंत्रणे मी त्यांना देऊ लागलो. तेंडुलकरांनी कॉलम लिहायला सुरवात केली.विदेशी चित्रपटांच्या पटकथांचा अभ्यास करणे हा त्यामागचा हेतू होता. हे नंतर मला कळले. तेंडुलकरांचा हा कॉलम चांगल्यापैकी लोकप्रिय झाला. गन्स ऑफ नव्हारोने हा चित्रपट रेक्स थिएटरमधे ४०व्या आठवड्यात जोरात सुरु होता. म्हणून त्याची बातमी टाकताना तेंडुलकरांनी हेंडिग दिले नव्हारोनेच्या तोफा अजून धडाडतच आहेत.त्याच काळात अनंत माने दिग्दर्शित 'मानिनि’ हा चित्रपट प्रकाशित होणार होता.तेंडुलकर मला म्हणाले, 'मला तो बघायचा आहे’ त्यासाठी माझे आणि त्यांचे अशी दोन तिकीट मागविली. सेंट्रल सिनेमात आम्ही मानिनी पहायला गेलो. इंटरव्हल पूर्वीच मानिनीची आई मरण पावते. मानिनीच्या बहिणीच्या लग्नात अपमान होतो आणि ती आपल्या नवऱ्याच्या घरी निघून जाते इथे इंटरव्हल होतो. मध्यंतरात तेंडुलकर म्हणाले आता मानिनीची मृत आई तिला भेटायला येणार. झाले तसेच मध्यंतरांनंतर जयश्री गडकरला (मानिनी) तिची आई भूत होऊन भेटते.

मानिनी हा चित्रपट महादेव शास्त्री जोशींच्या लघुकथेवर बेतलेला होता. त्३ााची पटकथा व्यंकटेश माडगुळकरांची होती. 'मानिनी’ चित्रपट तुफान यशस्वी झाला. तेव्हा एक गोष्ट माझ्या ध्यानी आली पटकथेचा अभ्या करण्यासाठी तेंडुलकर चित्रपट पहायला येतात.

तेंडुलकरांना चित्रपट माध्यम कमालीचे प्रिय होते. १९९७ साली आम्ही मुंबईचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरु केला. तेव्हा तेंडुलकर डेलीगेट वर्गणी भरून प्रतिनिधी व्हायचे आणि पहिल्या दिवशी माझ्याकडे यायचे आणि महोत्सवाचचे टाइमटेबल माझ्या समोर ठेवून म्हणायचे कोणते महत्तवाचे चित्रपट त्यावर खुणा करा. मी महोत्सवाचा आर्टिस्टिक डायरेक्टर होतो. त्यामुळे निवड समितीत मी सर्व चित्रपट आधी पाहिलेले असल्याने तेंडुलकर शिफारस करायला सांगायचे. थोडक्यात तेंडुलकरांचा चित्रपटांचा अभ्यास अखेरपयंर्त चालू होता. एकदा त्यांनी माझे कौतुक केले. 'अहो तुमच्यामुळे जगातले उत्तमोत्तम चित्रपट आम्हाला इथे पहायला मिळतात.’ तेंडुलकारंनी पहिली पटकथा लिहली तो चित्रपट 'प्रार्थना’ तो हिंदी होता. आणि त्याचे दिग्दर्शक होते वसंतराव जोगळेकर.

पुढचा इतिहास सर्वाना ठाऊकच आहे.

सुधीर नांदगांवकर



चित्र-चरित्र