चित्र-चरित्र

प्रवीण दवणे
प्रवीण दवणे
कवी, गीतकार, चित्रपट लेखक
६ एप्रिल १९५९

कवी, गीतकार, चित्रपट लेखक अशी विविधांगी कामगिरी करण्यात प्रवीण दवणे यशस्वी ठरले आहेत. त्यांनी आपल्या बाल वयातच लेखनासाठी प्रारंभ केला. श्री. दवणे हे ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे येथे गेली तीस वर्षे अध्यापन करत आहेत. दवणे यांनी विविध माध्यमांतून वाङ्मयाच्या विविध प्रकारचे लेखन केले आहे. “सावर रे !”, “स्पर्शगंध”, “रंगमेध”, “गंधखुणा”, “हे शहरा” हे त्यांचे रसिकप्रिय काव्यसंग्रह. "आई परत येते", "स्माईल प्लीज", "श्रीयुत सामान्य माणूस","प्रिय पप्पा" ही नाटके त्यांची रंगमंचावर आली आहेत. दवणे यांनी ‘ठकास-महाठक’, ‘झपाटलेला’, ‘दे दणादण’, ‘थरथराट’, ‘आम्ही असू लाडके’, ‘आम्ही सातपुते’, ‘शुभमंगल सावधान’, ‘अदलाबदली’, ‘एकुलती एक’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘आयडियाची कल्पना’ अशा १२५हून अधिक मराठी चित्रपटासाठी गाणी लिहिली आहेत. महेश कोठारे, सचिन पिळगांवकर या दिग्गजांच्या चित्रपटांसाठी दवणे यांनी काम केलं आहे. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी संवादलेखनही केलं आहे. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली आहेत. त्यांनी अनेक भावगीते व भक्तिगीते गाणी लिहिली आहेत.



चित्र-चरित्र