चित्र-चरित्र

मधुरा वेलणकर
मधुरा वेलणकर
अभिनेत्री
८ ऑक्टोबर १९८१

चित्रपट, नाटक आणि टीव्हीमालिका या तीनही माध्यमांवर स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटविणारी अभिनेत्री म्हणजे मधुरा वेलणकर. अभिनयाचं बाळकडू तिला लहानपणीच मिळालं. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ या २००३ मधील चित्रपटाद्वारे तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच वर्षी तिने हिंदीतील ‘जजंतरम मंतरम’ हा अॅडव्हेंचर आणि फॅंटसीपटही केला. मधुराचे त्यानंतरचे उल्लेखनीय चित्रपट म्हणजे ‘अधांतरी’, ‘खबरदार’, ‘मातीच्या चुली’, ‘सरीवर सरी’, ‘गोजिरी’, ‘मी अमृता बोलतेय’, ‘मेड इन चायना’, ‘उलाढाल’, ‘हापूस’, ‘कॅनव्हास’. ‘जॉनी जॉनी येस पापा’ या हिंदी चित्रपटामध्येही ती झळकली. चित्रपटांबरोबर मधुरानं टीव्ही माध्यमातही भरपूर काम केले. ‘मृण्मयी’, ‘चक्रव्यूह’, ‘सांज सावल्या’, ‘अनामिका’, ‘रिश्ते’ या तिच्या लोकप्रिय मालिका. ‘लग्नबंबाळ‌’, ‘मि. अॅंड मिसेस’, ‘हा शेखर खोसला कोण आहे’ या नाटकांद्वारे तिने रंगभूमीवरही आपली चमक दाखवली. २०१८ मध्ये तिने अखिल भारतीय मराठी नाट्य महामंडळाची निवडणूक लढवली आणि त्यात ती विजयी ठरली. युवा होतकरू मुला-मुलींसाठी ती कार्यशाळाही आयोजित करीत असते.

'भाई व्यक्ती की वल्ली', 'मी शिवाजी पार्क' हे मधुरा अभिनीत अलीकडील मराठी चित्रपट. तसेच 'मृण्मयी' या मालिकेमध्येही ती झळकली आहे.

मंदार जोशी



चित्र-चरित्र