चित्र-चरित्र

किशोरी अंबिये
किशोरी अंबिये
अभिनेत्री
२५ जून १९६७

मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवर गेल्या तीन दशकांपासून वावरणारा चेहरा म्हणजे किशोरी अंबिये. मराठी चित्रपटांना चांगले दिवस येण्यापूर्वीच्या काळातही किशोरी अंबिये यांनी भरपूर काम केलं. ‘झपाटलेला’, ‘खतरनाक’, ‘चश्मेबहाद्दर’, ‘डम डम डिगा डिगा’, ‘आबा झिंदाबाद’, ‘ सालीनं केला घोटाळा’, ‘चालू नवरा भोळी बायको’, ‘बाबा लगीन’, ‘लाडी गोडी’, ‘पकडापकडी’, ‘वन रुम किचन’, ‘पुणे व्हाया बिहार’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. कॉमेडीच्या अचूक टायमिंगमुळे त्यांनी ‘फु बाई फु’ हा कार्यक्रमही गाजविला. ‘तुझे माझे जमेना’, ‘देवयानी’, ‘पडोसन’ (हिंदी) या मालिकांमध्येही त्या झळकल्या. ‘भोळे डांबिस’, ‘लगे रहो राजाभाई’, ‘चुप गुपचुप’, ‘उसना नवरा’, ‘महासागर’, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही काही त्यांची उल्लेखनीय नाटके.

'गर्ल्स', 'पकडापकडी', 'शुभमंगल सावधान', 'बॉईज २' हे किशोरी अंबिये यांचे अलीकडचे महत्त्वाचे मराठी चित्रपट. 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेमधील त्यांच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं.

मंदार जोशी



चित्र-चरित्र