चित्र-चरित्र

गुरु ठाकूर
गुरु ठाकूर
गीतकार-पटकथा लेखक
१८ जुलै

गीतकार, पटकथा लेखक आणि अभिनेता अशा तिहेरी आघाड्यांवर सध्या गुरू ठाकूर यांची घोडदौड सुरू आहे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी ‘कार्टुनिस्ट’ म्हणून केली. मुंबईतील काही नियतकालिके तसेच मासिकांसाठी त्यांनी व्यंगचित्रे काढली. या नियतकालिकांसाठी त्यांनी प्रासंगिक लेखनही केले. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ या मालिकेद्वारे त्यांच्या लेखनाला रसिकांकडून पहिली पोचपावती मिळाली. त्यानंतर गेल्या दशकभरात त्यांच्या लेखनाचा धडाका सुरू आहे. ‘नटरंग’साठी त्यांनी लिहिलेल्या पटकथेचे तसेच गाण्याचे रसिकांकडून कौतुक झाले. ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’, ‘इश्कवाला लव्ह’, ‘यलो’, ‘झपाटलेला २’, ‘लय भारी’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट. सध्या रंगभूमीवरही ते आपल्या गाण्यांवर आधारलेला कार्यक्रम सादर करीत आहेत.

'प्रवास', 'कृतांत', 'विकून टाक',' रेडू' हे गुरु ठाकूर यांनी गीते लिहिलेले अलीकडचे काही चित्रपट.

मंदार जोशी



चित्र-चरित्र