थांब लक्ष्मी कुंकू लावते
१९६७

कौटुंबिक
३५ मिमी/कृष्णधवल/११०मि./प्रमाणपत्र क्र. बी ५१८३३/९-१०-१९६७./यू

निर्मिती संस्था :रसिक चित्र
निर्माता :दत्ताराम गायकवाड
दिग्दर्शक :दत्ता धर्माधिकारी
कथा :पं. महदेवशास्त्री जोशी
पटकथा :दत्ता केशव
संवाद :दत्ता केशव
संगीत :प्रभाकर जोग
छायालेखन :सूर्यकांत लंवदे
संकलक :एन. एस. वैद्य
गीतलेखन :जगदीश खेबूडकर
कला :दिनानाथ चव्हाण
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर
वेषभूषा :दिनकर जाधव
नृत्य दिगदर्शक :सरोजा
स्थिरचित्रण :मोहन लोके
गीत मुद्रण :मंगेश देसाई, मिनू कात्रक, भन्साळी, बी.एन्. शर्मा
ध्वनि :बाबू लिंगनूरकर
निर्मिती स्थळ :शांतकिरण नियंत्रित शालीनी सिनेटोन, कोल्हापूर
रसायन शाळा :शंभू नाईक, एस.एम.वाटणकर, राजकमल कलामंदिर रसायन शाळा
कलाकार :अंजनी, अरुण सरनाईक, चंद्रकांत गोखले, चित्तरंजन कोल्हटकर, जयश्री गडकर, प्रतिभा शेट्टे, बाळकोबा गोखले., बी. माजनाळकर, मधुकर आपटे, राजशेखर, लता काळे, वसंत लाटकर, वसंत शिंदे, विवेक, शांता तांबे, संध्या कुलकर्णी, सुषमा
पार्श्वगायक :लता मंगेशकर, आशा भोसले
गीते :१) अमर होऊनिया राही, २) कथा ही पुराणी, ३) घेऊ कसा उखाणा घेऊ कसा उखाणा, ४) दिवा पाहुनि लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना, ५) उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करी, ६) या तंग पैठणीचा चोळीवरी न राग, ७)ही सांग कशाची किमया
कथासूत्र :गावातील मोठ्या वाड्यावर दिवाळी असूनही शांतता असते.वास्तविक या वाड्यात तीन भाऊ,त्यांच्या बायका,मुले असा मोठा परिवार राहत असतो. पण त्या घरात एकी,शांतता,समाधान नसते.व्यसन,मारामाऱ्या,हेवेदावे यांनी तो वाडा पोखरलेला असतो.धाकटी सून अन्नपूर्णा मात्र कर्तबगार असते.एक दिवस वाड्याला कंटाळून जाणाऱ्या लक्ष्मीदेवीला ती अडवते. ती सांगते,'थांब लक्ष्मी कुंकू लावते.'लक्ष्मी कुंकू लावेपर्यंत थांबण्याचं वचन देते.

सामायिक करा :

अधिक माहिती