१२ वर्षे ६ महिने ३ दिवस
१९६७

रहस्यपट
३५ मिमी/कृष्णधवल/ मि./प्रमाणपत्र क्र. बी ५१८५०/११-१०-१९६७./यू

निर्मिती संस्था :ऋतुराज चित्र
निर्माता :वसंत पेंटर
दिग्दर्शक :वसंत पेंटर
कथा :ना. ग. करमरकर
पटकथा :ना. ग. करमरकर
संवाद :ना. ग. करमरकर
छायालेखन :अरविंद लाड, निळकंठ
संकलक :रामराव घाटगे
गीतलेखन :जगदिश खेबूडकर
कला :अशोक पेंटर
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर
वेषभूषा :विठ्ठल
नृत्य दिगदर्शक :बी. कुलकर्णी
स्थिरचित्रण :चिमासाहेब घोरपडे
गीत मुद्रण :बी. एन. शर्मा, मंगेश देसाई
ध्वनि :रामनाथ जठार
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज्, प्रा. लि., दादर
कलाकार :अशोक कोलते, उमा, जयमाला काळे, जोग, डॉ. शिंदे, नाना करमरकर, रत्नमाला, राजशेखर, विमलाबाई कर्नाटकी, विवेक, सूर्यंकांत
पार्श्वगायक :कृष्णा कल्ले, बालकराम, कृष्णकांत दळवी
गीते :१) आले वयात आले वयात, २) अंगठीत बसवा माझ्या, ३) जरा जपून चढा पायरी, ४) शरण मज पुढे सार्याअ कवी कल्पना, ५) ओ सुरूं झाल्या गण गौळणी
कथासूत्र :भुईपाचर गावात चोरीच्या तपासासाठी निघालेले पोलीस इन्स्पेक्टर पाटलांना, जवळच्या दरीतून जाऊ या,असे सांगतात.तेव्हा पाटील त्यांना सांगतात,'ही दरी भुताची आहे,इथून नको.'पण इन्स्पेक्टर हे मानत नाहीत.ते दरीतून जात असताना त्यांना एक पेटी सापडते.त्या पेटीत हाडांचा सापळा असतो.या सापळ्यांच्या गळयातील सोन्याच्या लॉकेटमध्ये एका सुंदर तरुणीचा फोटो असतो.तो एका नाचणाऱ्या मुलीचा असतो.ती बाई सापडते.पण तिचे वय असते १७ तर लॉकेटमध्ये असलेल्या फोटोतील बाईचे वय असते ३०-३२ वर्षे.पोलीस तपास घेत असतानाच तीन खून उघडकीला येतात आणि गूढ उकलते.

सामायिक करा :

१२ वर्षे ६ महिने ३ दिवस - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती