बाई मी भोळी
१९६७

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/११० मि./प्रमाणपत्र क्र. बी ५२२६५/१-१२-१९६७./यू

निर्मिती संस्था :हेमंत चित्र
निर्माता :कृष्णा पाटील, पी. बी. पाटील, सुधाकर खोत
दिग्दर्शक :कृष्णा पाटील
कथा :द. का. हसमनीस
पटकथा :द. का. हसमनीस
संवाद :द. का. हसमनीस
संगीत :राम कदम
छायालेखन :शंकर सावेकर
संकलक :जी. जी. पाटील
गीतलेखन :जगदिश खेबूडकर
कला :बळीराम बीडकर
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर
वेषभूषा :गणपत जाधव
नृत्य दिगदर्शक :रंजन साळवी
स्थिरचित्रण :नवरंग सिने आर्ट, मुंबई
गीत मुद्रण :मंगेस देसाई
ध्वनि :रामनाथ जठार
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरी प्रा. लि., मुंबई
कलाकार :के. घोरपडे, गणपत पाटील, चंद्रकांत, जयश्री गडकर, जोग, बर्ची बहाद्दर, भालचंद्र, मधुकर आपटे, वसंत शिंदे
पार्श्वगायक :आशा भोसले, उषा मंगेशकर, बालकराम, वाघमारे, राम कदम
गीते :१) श्री शंकरा तुझ्या गणास, २) ऐकला हुकुम राजाचा, ३) मिशिवर ताव मारतोय, ४) दाजिबाच्या वाड्यात गडबड झाली, ५) अहो ऐका ऐका गांवकरी, ६) हे दिवस थंडिचं असून काहिली झाली, ७) गांव पडलं हे टग्यांचं, ८) सांगा कसं मी वागायचं
कथासूत्र :मौजे रिंगणी म्हणजे एवढंसं गाव.त्या गावचे एक मुकादम रामराव चौगुले जॉबर म्हणून मुंबईला होते.त्यांनी गाव सुधारण्याचा चंग बांधला.त्यांचा हा विचार गावाला पटला आणि गावाने या कार्यात त्यांना मदत करण्यास सुरवात केली.पण अचानक मुकादम नाहीसे झाले.सगळीकडे चौकशीला सुरवात होते.गावातील सावकाराची दुसरेपणाची देखणी बायको रंगू हिच्यावर सगळ्यांचा संशय असतो.शेवटी पोलिसांना कळते की मुकादमांचा खून झालेला आहे.पोलीस ते गूढ उकलून काढतात.

सामायिक करा :

बाई मी भोळी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती