सुखी संसार
१९६७

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१०३ मि./प्रमाणपत्र क्र. बी ५२२४२/२५-११-१९६७./यू

निर्मिती संस्था :बाळकृष्ण प्रॉडक्शन
निर्माता :बाळकृष्ण कदम, रमेश कंथारिया
दिग्दर्शक :श्रीकांत सुतार
कथा :य. ना. टिपणीस
पटकथा :आशा सुतार
संवाद :आशा सुतार
संगीत :यशवंत देव
छायालेखन :ए. के. कदम
संकलक :मनोहर प्रभू
गीतलेखन :पी. सावळाराम, स. अ. शुक्ल
रंगभूषा :कृष्णा चव्हाण
केशभूषा :विजया कामत
वेषभूषा :शेखलाल
नृत्य दिगदर्शक :कृष्ण मूर्ती
स्थिरचित्रण :स्टुडिओ रणदिवे
गीत मुद्रण :बी.एन. शर्मा
ध्वनि :मंगेश देसाई
निर्मिती स्थळ :मुंबई
रसायन शाळा :रॅमनॉर्ड लॅबोरेटरीज्
कलाकार :गिरीश तावडे, दादा साळवी, दामुअण्णा मालवणकर, नीलम, बाळ गोसावी, मधुकर आपटे, मनीषा, माई भिडे, रणजित बुधकर, रमेश देव, राजा गोसावी, विवेक, श्रीधरराव, सीमा, सुधीर, सुलोचना
पार्श्वगायक :आशा भोसले, सुमन कल्याणपूर, अरुण दाते, सुधीर फडके, कृष्णा कल्ले
गीते :१) मी नाही कुणाची नाही नाही कुणाची, २) सोळाव वरीस उलटुनी गेले, ३) मी सागर मी धरती, ४) टिक टिक टिक घड्याळ हे बोले, ५) भगवंताची करणी सारी भगवंताची करणी
कथासूत्र :मद्रासला वास्तव्य करणाऱ्या धार्मिक केदारनाथ यांची मुलगी लंका ही मुंबईतील एका धूर्त आणि पाताळयंत्री माणसाचा मुलगा सारंग याला दिलेली असते.सारंगचे सारे लक्ष केदारनाथांच्या इस्टेटीवर असते.पण सारंगची बहीण लकेरी मात्र लंकेवर मनापासून प्रेम करीत असते. केदारनाथ मृत्युशय्येवर असताना मृत्युपत्र करतात.पण दरबारी खोटे मृत्युपत्र करून त्यावर केदारनाथांची सही घेतो.त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीलाही विष घालून मारतो.मुले,माला आणि कल्याण याना बदमाशांच्या मदतीने भीक मागायला लावतो.या धक्क्याने लंका वेडी होते.तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर हमीरवर लकेरीचे प्रेम बसते.पण दरबारी तिचे लग्न वेडसर सोरटबरोबर ठरवतो.शेवटी दरबारीची सगळी कारस्थाने उघडकीस येतात आणि त्याला शिक्षा होते.

सामायिक करा :

सुखी संसार - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती