पाठचा भाऊ
१९६७

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१०२ मि./प्रमाणपत्र क्र. बी ५२२२५/२४-११-१९६७./यू

निर्मिती संस्था :श्री सुरेश चित्र
निर्माता :दत्ता माने
दिग्दर्शक :दत्ता माने
कथा :बाळ पोवार
पटकथा :दिनकर द. पाटील
संवाद :दिनकर द. पाटील
संगीत :राम कदम
छायालेखन :सुर्यकांत लवंदे
संकलक :गंगाराम माथफोड
गीतलेखन :जगदीश खेबुडकर
कला :बळीराम बीडकर
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर, निवृत्ती दळवी
वेषभूषा :दिनकर जाधव
नृत्य दिगदर्शक :रंजन साळवी, लिला गांधी
स्थिरचित्रण :लिला आर्टस्, चिमासाहेब घोरपडे
गीत मुद्रण :मंगेश देसाई, राजकमल कला मंदिर
ध्वनि :बाबा लिंगनूरकर
निर्मिती स्थळ :शांत किरण नियंत्रित, शालिनी सिनेटोन, कोल्हापूर
रसायन शाळा :शंभू नाईक, राजकमल कला मंदिर, मुंबई
कलाकार :चंद्रकांत, चंद्रकांत नागिणे, दादा साळवी, नीलम, बापूराव गावडे, लिला गांधी, वसंत शिंदे, सुलोचना, सुषमा, सूर्यंकांत
पार्श्वगायक :सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, कृष्णा कल्ले, वसंतराव देशपांडे
गीते :१) नागराजा ग देवराजा की देवराजा, २) अग थांब थांब साजणी, ३) धावा धावा घात झाला, ४) अरं सुटबुटवाल्या पोरा, ५) काय बाई झालं माझ्या मनाला, ६) तुमच्या राणीचा काढा रूसवा, ७) जुळी बालके आंत झोपली माय, ८) एका सुखाच्या संसाराचा येळकोट झाला कसा
कथासूत्र :खंडेराव आणि लक्ष्मी याना मुलबाळ नसते.त्यामुळे लक्ष्मी खंडेरावचा पाठचा भाऊ श्रीरंग यालाच आपल्या मुलासारखे वागवते.श्रीरंग शिक्षणासाठी कोल्हापूरला असतो. विजया आणि श्रीरंगचे प्रेम पाहून लक्ष्मी-खंडेराव आनंदाने त्यांचे लग्न लावून देतात.विजयाची पाठराखीण म्हणून मंजुळा येते. मंजुळा विजयाच्या मनात नाही नाही ते भरवून देते.खंडेराव शेवंती या नाचणारणीच्या मागे लागतो.श्रीरंगही लक्ष्मीविरुद्ध जातो.विजया घराची वाटणी करायला सांगते.दोघा भावांमधले वैर वाढत जाते.पण शेवटी त्यांची चूक त्यांना कळून येते.

सामायिक करा :

पाठचा भाऊ - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती