स्वराज्याच्या सीमेवर
१९३७

ऐतिहासिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२७१९ फूट/११३ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १८१०४/१६-८-३७

निर्मिती संस्था :प्रिन्स शिवाजी प्रॉडक्शन
दिग्दर्शक :मेजर दादासाहेब निंबाळकर
कथा :भालजी पेंढारकर
पटकथा :भालजी पेंढारकर
संवाद :भालजी पेंढारकर
संगीत :दादा चांदेकर
छायालेखन :एस्. पी. शिंदे
गीतलेखन :भालजी पेंढारकर
कला :शंकरराव शिंदे
वेषभूषा :घाणेकर
ध्वनिमुद्रक :चिंतामणराव मोडक
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :कर्नल नानासाहेब हंगळे, कुमार दिलीप, नानासाहेब फाटक, शंकरराव भोसले, जयश्री घोरपडे, मा. सुरेश, दिनकर कामण्णा, राजा पंडित, समर्थ
गीते :१) शून्य सदन दिसते बाई, २) तिन्ही साजचं गेली ग पा र्‍याला, ३) गेले मोहुनिया आनंद सदनी, ४) सांग ते सुचवले गे, ५) नारी नादाने चाकरी ग सुटली,
६) पतिचरण फिरूनिया सदनी, ७) भवे पूजिला नित, ८) वद कुठला मजला धारा, ९) दया दावी देवा दयाळा, १०) फकड उमदे हे जवान, ११) वीर वृत्तीचा भगवा झेंडा.
कथासूत्र :शिवाजी महाराज आपल्या देवगावला येणार म्हणून त्यांचा शिलेदार राया हा त्यांच्या स्वागताच्या तयारीत मग्न असतो.महाराजांचा मुक्काम ज्या देवळात होणार असतो,ते मंदिर उडवून देण्याचा डाव बाटगा सरदार सुभानअली रचतो.तो निजामपूरकरांच्या पदरी नोकरीस असतो.मोठ्या बक्षिसाच्या आशेने दुसरा फितूर हिरोजी या कारस्थानात सुभानअलीला साथ देतो.सुभानचा डोळा रायाच्या सुंदर पत्नीवर असतो. राया आत्मसमर्पण करून या कटाचा निकाल लावतो.पण मरता मरता तो सुभानलाही आपल्या बरोबरच नेतो.

सामायिक करा :

स्वराज्याच्या सीमेवर - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती