कुंकू
१९३७

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१४६२० फूट/१३० मिनिटे/ प्रमाणपत्र क्र.१८३५२/२७-१०-३७

निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
कथा :ना.ह.आपटे
पटकथा :ना.ह.आपटे
संवाद :ना.ह.आपटे
संगीत :केशवराव भोळे
छायालेखन :व्ही.अवधूत
संकलक :व्ही. शांताराम
गीतलेखन :शांताराम आठवले, लाँग फेलो, (सुप्रसिद्ध इंग्रजी कवी)
कला :साहेबमामा फत्तेलाल
गीत मुद्रण :विष्णुपंत दामले
ध्वनिमुद्रक :शंकरराव दामले
ध्वनिमुद्रिका :एच.एम.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :पुणे
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी, पुणे.
कलाकार :शांता आपटे, विमलाबाई वसिष्ठ, शकुंतला परांजपे, वासंती, गौरी, मा. छोटू, राजा नेने, केशवराव दाते
गीते :१) एक होता राजा, २) रचिले प्रभुने जग हे विशाल, ३) सुखशयनी शैयेवरती, ४) दुःखांत काळ का घालविशी, ५) भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, ६) जयदेवी मंगळागौरी, ७) मन सुद्ध तुझं गोष्ट हाये. ८) भादव्यात येता गौरी गणपती In the world's broad field of battle.
कथासूत्र :पैशाच्या लोभानं नीरेचा मामा तिचं लग्न एका श्रीमंत पण वृद्ध वकीलांशी लावून देतो.समाजरुढीनं जखडलेली नीरा तडफ़दारपणे बंड करून उठते.अखेरीस तिच्या पतीला-काकासाहेबांना-स्वतःची चूक उमगते,अस्वस्थ करते.आत्महत्त्या करून ते नीरेची सुटका करतात.
विशेष :पार्श्वसंगीताला फाटा देऊन ध्वनीचा मार्मिकपणे उपयोग करणारा पहिला चित्रपट १९३७ सालचा सर्वोत्तम चित्रपट या नात्याने गोहर पारितोषिक. मराठी बरोबरच कुंकूची हिन्दी आवृत्ती ‘‘दुनिया न माने” प्रदर्शित झाली.
श्री. नारायण हरी आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवरून हा चित्रपट घेतला होता. ‘कुंकू’वर हंसचे लेखक प्र.के.अत्रे व वि.स.खांडेकर, तसेच मामा वरेरकर यांनी टीका केली होती. कादंबरी लेखक ना.ह. आपटे यांनी लेख लिहून शांतारामबापूंनी आपल्या कथेला न्याय दिला असे म्हटले. मो. ग. रांगणेकरांनी शांतारामबापूंची प्रदीर्घ मुलाखत मौजेच्या १९३८ सालच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध केली.

सामायिक करा :

कुंकू - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती