भक्त दामाजी
१९३७

संतपट
३५ मिमी/कृष्णधवल/१३६७० फूट/१२२ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १८१५८/३१-८-३७

निर्मिती संस्था :शिवाजी मुव्हीटोन कंपनी
दिग्दर्शक :के .बी. आठवले
कथा :के.अ.स.त्रिलोकेकर
पटकथा :के.अ.स.त्रिलोकेकर
संवाद :के.अ.स.त्रिलोकेकर
संगीत :गाडगीळ, बेणेकर
छायालेखन :प्राणजीवन शूक्ल
गीतलेखन :के.अ.स.त्रिलोकेकर
कला :वाय.ई.हाटे
गीत मुद्रण :हाय फिडेलीटोन
ध्वनिमुद्रक :पिल्ले, चार्ली
निर्मिती स्थळ :मुंबई
कलाकार :बंडोपंत सोहनी, पी.आर.जोशी, त्र्यंबकराव प्रधान, विष्णूपंत घाणेकर, शांताराम समर्थ, बाबा चीतेकर, गंगूबाई, लीला, शांताबाई, कृष्णाबाई
गीते : १) अन्न दान गरीबा येथे, २) घ्या प्रेम रसाचा पेला, ३) शुभ पुण्यदायी हा, ४) जारे जारे सैंया, ५) प्रभू झणीं धाव राखी दीन जना, ६) अन्नदान गरीबा जेथें, ७) सदासुखे आळवी विठ्ठला, ८) दुनिया विषमय झाली, ९) हा चाकुर दामाजींचा.
कथासूत्र :मंगळवेढ्याचा ठाणेदार पांडुरंगभक्त दामाजी हा गरीब प्रजा आणि सत्ताधारी राजा यांचे संबंध बिघडणार नाहीत याची सतत काळजी घेतो.पण जेव्हा दुष्काळ पडून प्रजा अन्नाला मोताद होते,तेव्हा दामाजी धान्याची कोठारे गोरगरिबांसाठी खुली करतो.त्याबद्दल त्याला कैद होते.तथापि प्रत्यक्ष परमेश्वर विठू महाराच्या रूपात येऊन बेदरच्या बादशहाला अन्नधान्याचे पैसे देऊ करतो आणि भक्त दामाजीची सुटका होते.
विशेष :एकच गाणे दोनदा असणारा पहिला मराठी चित्रपट. गीत होते -‘‘अन्नदान गरीबा जेथे”

सामायिक करा :

भक्त दामाजी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती