प्रेमवीर
१९३७

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२०४३ फूट/११० मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. १८१९९/९-९-३७

निर्मिती संस्था :हंस पिक्चर्स
दिग्दर्शक :मा. विनायक
कथा :प्र. के. अत्रे
पटकथा :र. शं. जुन्नरकर
संवाद :प्र. के. अत्रे
संगीत :अण्णासाहेब माईणकर
छायालेखन :वासुदेव कर्नाटकी
संकलक :र. शं. जुन्नरकर
गीतलेखन :प्र.के.अत्रे, कुमुदबांधव
रंगभूषा :शंकर गौड
वेषभूषा :घाणेकर
रसायन :गोपाळ कांबळे
ध्वनिमुद्रक :राजाराम दातीर
ध्वनिमुद्रिका :एच्.एम्.व्ही. रेकॉर्ड कंपनीने टिवन लेबल खाली ध्वनीमुद्रिका काढल्या होत्या
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :गोपाळ कांबळे
कलाकार :आशालता, फिरोझा, दादासाहेब साळवी, बापूराव दातार, यशवंत पेठकर, घारपुरे, मा. विनायक
गीते :१) चला भरा हा प्रणयरसाचा, २) किती आठवू हा माझा, ३) सावध हो मनूजा, ४) द्या हो मजला प्रीतिचा, ५) यारे सारे नमन कराया, ६) सखी ही तुमची सासरी, ७) चल ये साजणी गुंफू हार प्रणयाचा.
कथासूत्र :कॉलेजची ब्युटी क्वीन पुतळी हिनं झिडकारूनसुद्धा तिचं प्रेम संपादन करण्याचे प्रीतमचे प्रयत्न चालूच असतात.त्याने कॉलेज सोडावं म्हणून त्याचे चुलते त्याची आर्थिक मदत बंद करतात.तेव्हा प्रीतम एका वर्गमित्राच्या घरी नोकरी मिळवतो.प्रीतमच्या प्रेमप्रकरणाला रंगत येऊ लागते.पुतळीच्या पित्याचा तिचे लग्न एका बॅरिस्टरशी लावून देण्याचा प्रयत्न फोल ठरतो.
विशेष :या चित्रपटापासून मराठी चित्रपटामध्ये पार्श्वगायन सुरू झाले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक यशवंत पेठकर यांनी कॉमेडी-व्हिलन म्हणून काम केले होते. चित्रपटातून अनेक वेषांतर करणारा नायक प्रथम दिसला. मराठी बरोबर हिन्दी आवृत्ती.

सामायिक करा :

प्रेमवीर - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती