साध्वी मीराबाई
१९३७

संतपट
३५ मिमी/कृष्णधवल/१२५८४ फूट/११२ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. १८१८९/७-९-३७

निर्मिती संस्था :बालगंधर्व रूईकर प्रॉडक्शन
दिग्दर्शक :बाबूराव पेंटर
कथा :वसंत शांताराम देसाई
पटकथा :वसंत शांताराम देसाई
संवाद :वसंत शांताराम देसाई
संगीत :जी.एम्.लोंढे, मास्टर कृष्णराव
छायालेखन :आर.ए.कांबळे
गीतलेखन :वसंत शांताराम देसाई
ध्वनिमुद्रक :एस्.ए.दलाल, बी.जी.देसाई
निर्मिती स्थळ :फिल्म सिटी, मुंबई
कलाकार :बालगंधर्व, जी. एम्. लोंढे, हरिभाऊ देशपांडे, वालावलकर, पारगांवकर, वेर्णेकर, अभ्यंकर, भांडारकर, पाटील, वाईकर (देशपांडे), मिस्. रोषन
गीते :१) जय जय देवी प्रणाम, २) पतिदेवता गुरू देवता, ३) पायोरी मैंने रामरतन धन पायो, ४) भाई मैने गोविंद, ५) गांजिसी वाया दीन जना, ६) काया गडका मेवासी, ७) तुम विदूर घर जाये, ८) कटु योजनाही, ९) गमने सदा मजला, १०) पूजा धर्म माते, ११) धन्य तूची कांता, १२) धांवत येई सख्या यदुराया, १३) प्रगट भये भगवान, १४) धवल लौकिका, १५) हसत डुलत जनता, १६) ही समज तव कुटिल चतुराई, १७) प्रभु पहा प्रिय जनी रंगला.
कथासूत्र :उदेपूरची महाराणी मीराबाई हिला एकच धर्म अभिप्रेत होता-मानवधर्म.सर्व प्राणिमात्रांवर सारखेच प्रेम करायचे हा तिचा धर्म.साहजिकच तिचे संसाराकडे दुर्लक्ष होते.महाराणा कुंभ,सासू चंद्रावती आणि कुलगुरू विद्याशंकर हे नाराज असतात.त्यातच मीराबाई महाराणा कुंभाच्या शृंगारमहालात संत रामदासाला अतिथी म्हणून ठेवते.शुद्राने आणलेला द्वारकेचा प्रसाद भक्षण करते.ह्या सर्व गोष्टींमुळे पती,सासू व कुलगुरू जास्तच भडकतात आणि मीराबाईला प्राणदंडाची शिक्षा देतात.त्याचवेळी मीराबाई श्रीकृष्णाच्या मूर्तीत विलीन होते.
विशेष :बालगंधर्व नाटक मंडळीच्या सहयोगाने नटसम्राट बालगंधर्व यांनी सादर केलेली स्टेज टॉकी. बालगंधर्व यांनी स्त्रीवेशात सादर केलेला एकमेव चित्रपट, वसंत शांताराम देसाई यांच्या ‘‘अमृत सिद्धी” नाटकावरूनच चित्रपटाचे चित्रीकरण केले होते.

सामायिक करा :

साध्वी मीराबाई - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती