कान्होपात्रा
१९३७

संतपट
३५ मिमी/कृष्णधवल/१३१९१ फूट/११८मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. १८५४७/१०-१२-३७

निर्मिती संस्था :शालिनी सिनेटोन
दिग्दर्शक :भालजी पेंढारकर
कथा :भालजी पेंढारकर
पटकथा :भालजी पेंढारकर
संवाद :भालजी पेंढारकर
संगीत :बालजी चौघुले (सी. बालाजी)
छायालेखन :के. व्ही. माचवे, एस्.पी. शिंदे
गीतलेखन :भालजी पेंढारकर
कला :बाळ गजबर
गीत मुद्रण :शालिनी सिनेटोन, कोल्हापूर
ध्वनिमुद्रक :एम्. जी. श्रीखंडे, जी. एल्. काळे
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :लीला चंद्रगिरी, शांता हुबळीकर, इंदूबाला, सोनूबाई, गंगाधरपंत लोंढें, जयशंकर दानवे, चिंतामणराव कोल्हटकर, व्ही.बी.दाते, राजा परांजपे, दिनकर ढेरे, (कामण्णा), विद्याधर जोशी
गीते :१) सुखकर तव ध्यान देवा, २) देहउपाधी सोडोनी सगळे, ३) काय बाळे देव भुलतो, ४) चिमुकलं बाळ सांगती, ५) नित गानी ध्यानी, ६) जो खांडावया घाव घाली, ७) कान्हा मथुरेसी जाई, ८) सुजना छल निंदा, ९) काल हा आला, १०) ना हो आणिक श्रीहरी, ११) संत समागम साधतो, १२) रूप सांवळे सुकुमार, १३) दीन पतित अन्यायी, १४) पुरविली पाठ, १५) उच्च नाही नीच नाही महार नाही मांग नाही, १६) विठ्ठल विठ्ठल गजरी.
कथासूत्र :वारांगनेच्या घरी जन्मलेली कान्होपात्रा पवित्र तर राहतेच,शिवाय परमेश्वरावर तिची अपार श्रद्धा असते.तिच्यावर मोहित झालेल्या एका धनिकपुत्राच्या खुनाचा आरोप तिच्यावर येतो.वास्तविक,हा खून एका सरदाराने केलेला असतो.कान्होपात्रा निर्दोष ठरते आणि मग ती पंढरीच्या विठ्ठलपायीं लीन होते.जिथे ती अदृश्य होते त्या ठिकाणी एक वृक्ष दृग्गोचर होतो.तीच कान्होपात्रेची स्मृती.

सामायिक करा :

कान्होपात्रा - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती