सुदर्शन
१९६७

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/९५ मि./प्रमाणपत्र क्र. बी ५२५९२/३०-१२-१९६७./यू

निर्मिती संस्था :जीवन चित्र
निर्माता :आम. रत्नाप्पा कुंभार, बाळासाहेब पाटील (सत्त्यवादीकार)
दिग्दर्शक :दत्ता माने
कथा :बाळासाहेब पाटील
पटकथा :बाळासाहेब पाटील
संवाद :बाळासाहेब पाटील
संगीत :राम कदम
छायालेखन :वसंत शिंदे
संकलक :वसंत शेळके
गीतलेखन :बाळासाहेब पाटील
कला :बळीराम बीडकर
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर
वेषभूषा :दिनकर जाधव
नृत्य दिगदर्शक :बाबासाहेब मिरजकर, रंजन साळवी
स्थिरचित्रण :जय सिंग माने, (फेमस स्टुडिओ)
गीत मुद्रण :मंगेश देसाई, परमार
ध्वनि :बाबा लिंगनूरकर, बाळासाहेब चव्हाण
निर्मिती स्थळ :शांत किरण नियंत्रित शालीनी सिनेटोन
रसायन शाळा :राजकमल कलामंदिर
कलाकार :उमा, जीवनकला दत्तोबा कांबळे, जोग, दादा साळवी, नर्गिस बानू, बी. माजनाळकर, माणिकराज, रत्नमाला, राजा पंडित, सुधीरकुमार
पार्श्वगायक :कृष्णा कल्ले, बाळ शिर्के, पिराजीराव सरनाईक
गीते :१) नको धरू खंत आता, २) मन माझे रंगले रंगले, ३) हादेश श्री शिवबाचा, ४) मी ग पुण्याची सायकलवाली, ५) सरकार आले मनांत भरले, ६) दुःख मनीचे कुठवर साहू कुणास सांगू तरी, ७) महात्मा गांधीनी स्वराज्य आणलं
कथासूत्र :जीवन हा एक आदर्श ध्येयवादी आणि स्वाभिमानी तरुण दैनिक 'संपत्ती' चालवत असतो. या दैनिकाला प्रचंड लोकप्रियता मिळते. 'संपत्ती' च्या मालकांपैकी एक प्रसिद्ध चित्रपटतारका सुधालक्ष्मी आणि उदयोन्मुख हौशी नर्तिका वंदना यांच्या नृत्याच्या जुगलबंदीच्या कार्यक्रमात वंदना सरस ठरते.जीवन आपल्या परीक्षणात तसे स्पष्ट लिहितो.याचा परिणाम म्हणजे जीवनला'संपत्ती' चा राजीनामा द्यावा लागतो. जीवन 'सुदर्शन'नावाचे दैनिक काढतो.हे अल्पावधीतच लोकप्रिय होते.त्यामुळे 'संपत्ती' बंद पडण्याची वेळ येते. 'संपत्ती' चा मालक नवा संपादक पारिजात याला जीवनचा काटा काढण्यास सांगतात.

सामायिक करा :

सुदर्शन - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती