निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
कथा :ह.ना.आपटे
संवाद :गोविंदराव टेंबे
संगीत :गोविंदराव टेंबे
छायालेखन :केशवराव धायबर
संकलक :व्ही. शांताराम
गीतलेखन :गोविंदराव टेंबे
कला :साहेबमामा फत्तेलाल, विष्णुपंत दामल
ध्वनिमुद्रक :साहेबमामा फत्तेलाल, विष्णुपंत दामल
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी
कलाकार :शिंदे, शंकरराव भोसले, केशवराव धायबर, बजरबट्टू, बाबूराव पेंढारकर, बुवासाहेब, निंबाळकर, मा.विनायक, लीला चंद्रगिरी, प्रभावती
गीते :१) सुमन हे आदरा, २) सुप्रभाती सूर्य, ३) ऊठ गड्या चल वीर गड्या, ४) येडा झाला जीव, ५) हा कुठवरी छळ सहन करू, ६) ज्याची कीर्ती सा-या जगतात, ७) ही दुनिया चार दिनांची, ८) देवा ! हे दयासागरा.
कथासूत्र :सिंहगड किल्ला सर करण्याची शिवाजी महाराजांची इच्छा तानाजी मालुसरे या त्यांच्या शूर व विश्वासू सरदाराने,स्वतःच्या मुलाचे लग्न बाजूला ठेवून,स्वतःच्या हिमतीच्या आणि हुशारीच्या बळावर पूर्ण केली. पण यासाठी त्याला आपल्या प्राणांचे मोल द्यावे लागले.हे ऐकल्यानंतर दुःखावेगाने शिवाजी महाराज म्हणाले होते,''गड आला पण सिंह गेला.''
विशेष :या चित्रपटासोबत महाराष्ट्रातल्या प्रमुख कवींवर चित्रीकरण केलेला ‘कविसंमेलन’ नावांचा लघुपट दाखविला जात असे.