सैरंध्री
१९३३

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१०२१३ फूट/११४ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१३८११/१८-११-३३

निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
कथा :भालजी पेंढारकर
पटकथा :भालजी पेंढारकर
संवाद :भालजी पेंढारकर
संगीत :गोविंदराव टेंबे
छायालेखन :केशवराव धायबर
संकलक :व्ही. शांताराम
गीतलेखन :भालजी पेंढारकर
कला :साहेबमामा फत्तेलाल
ध्वनिमुद्रक :विष्णुपंत दामले - ध्वनीमुद्रिकाः टेलीफंकेन कंपनी, जर्मनी, प्रभात लेबल,
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :आग्फा कंपनी, जर्मनी
कलाकार :लीला चंद्रगिरी, अनुसया, प्रभावती, सुधा, निंबाळकर, कुलकर्णी, माने, भोसले, साळुंखे, मा. विनायक, भागवत
गीते :१) कुसुम कुंकुम अमित उधळुनी, २) मधुर सुम-माला गुंफोनिया, ३) हे पाक सदन नोहे, ४) बल्लवा समान बली, ५) नवबहार येई लतिकांना कुसुमांना कलिकांना, ६) मंजु मुरली परिसाया जाऊ ये साजणी, ७) परदास्य पंकी रुतला मनुज जो, ८) येई रे धावोनिया मधूसूदना, ९) अहा धावला सखा बंधुराया.
कथासूत्र :महाभारतातील कथानक.पांडव अज्ञातवासात गेले तेव्हा द्रौपदीला विराट देशाची राणी सुदेष्णा हिची दासी म्हणून राहावे लागले.ह्या तिच्या एक वर्षाच्या अपमानास्पद जगण्याच्या दास्यकालात विराट देशाचा उन्मत्त सेनापती कीचक द्रौपदीला(सैरंध्रीला)वंश करू पाहतो.पण ते न जमल्याने तो तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करतो.त्याच वेळेस भीम तेथे येतो आणि कीचकाचा पापी हात मुळापासून उखडून टाकतो आणि यातच कीचकाचा वध होतो.
विशेष :भरतातल्या पहिला रंगीत बोलपट होय. या चित्रपटाद्वारे भारतीय चित्रपटांच्या ध्वनीमुद्रिका सुरू झाल्या. या चित्रपटाच्या रसायन व आवृत्तीचे काम जर्मनी येथील उफा स्टुडिओत झाले व ध्वनीमुद्रिकाही तिथेच काढण्यात आल्या. ध्वनीमुद्रिकाही सैरंध्रीच्या मूळ ध्वनीफितीवरूनच सीमेन्सच्या टेलिफंकन रेकॉर्ड कंपनीने प्रेस करून प्रभात लेबलवर घेतल्या होत्या. अशा ध्वनिमुद्रिका बनविण्याची कल्पना शांतारामबापूंना चाळीस वर्षापूर्वी सुचली. आपल्याकडे सर्वत्र ग्रामोफोन रेकॉर्डिंग कंपन्या मूळध्वनीफितीवरूनच ध्वनीमुद्रिका काढत. सैरंध्रीची निर्मिती मराठी बरोबरच हिन्दी भाषेतूनही करण्यांत आली होती.

सामायिक करा :

सैरंध्री - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती