भक्त प्रल्हाद
१९३३

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१४५२५ फूट/१४० मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१२८९३/१४-११-३३

निर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन
दिग्दर्शक :के.पी.भावे
कथा :मो. ग. रांगणेकर
पटकथा :के.पी.भावे
संगीत :अण्णासाहेब माईणकर
छायालेखन :एस्.डी.पाटील
कला :गोखले, जी. वाटेगांवकर
गीत मुद्रण :दादासाहेब तोरणे
ध्वनिमुद्रक :दादासाहेब तोरणे
ध्वनिमुद्रिका :एच.एम.व्ही.ने ‘‘एन” सिरीजखाली प्रकाशित केल्या होत्या.
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :मा. मोहन कर्वे, दादा साळवी, रत्नप्रभा, शकुंतला, वेद पाठक, राम पाठक, वर्णे, जावडेकर, भोसले, वसंतराव पहेलवान
गीते :१) अंत जरी न चुके, २) प्रभो तुझे रूप, ३) जगा तू साऊली, ४) येई सुंदरा चंद्रानना, ५) अनुदिनी रमवित हे मन, ६) नांदला प्रभू मुरारी, ७) दिधला कुणा सांग, ८) जगी मी दैवहता, ९) किती किती गुणी बाळ माझा १०) देव भावाचा भुकेला, ११) तेल कढे त्या कमल करूनी, १२) मम जीवा सुखवाया, १३) येई धावुनि राणा, १४) हे दयाघना देवा १५) पाहसी किती ऐसा अंत, १६) प्रभु भक्तीची हाक ऐकूनी आला.
कथासूत्र :हिरण्यकश्यपूच्या खडतर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या ब्रम्हदेवाने त्याला मनुष्य किंवा पशू यांच्यापैकी कोणीही त्याचा वध करू शकणार नाही,असा वर दिला होता.त्याचा मुलगा प्रल्हाद याची विष्णूवर अपरंपार भक्ती.पण ही त्याची विष्णुभक्ती हिरण्यकश्यपूला अजिबात आवडत नसे.आपल्या मुलाने विष्णूचा नाद सोडावा,यासाठी त्याने छोट्या प्रल्हादबाळाचा अतिशय छळ करण्यास सुरवात केली.ते पाहून विष्णू आपल्या भक्ताच्या मदतीस धावून गेला आणि नरसिंहाचे रूप घेऊन त्याने हिरण्यकश्यपूचा वध केला.
विशेष :भक्त प्रल्हाद मध्ये ट्रिक फोटोग्राफीच्या सहाय्याने व स्पेशल लेन्सचा उपयोग करून चाळीस फूट उंचीचा नृसिंह निर्माण केला होता. बोलपटांतील स्पेशल इफेक्टस्मुळे त्यावेळी चित्रपट व्यवसायांत मोठी खळबळ माजली होती. भक्त प्रल्हादची निर्मिती मराठी बरोबर हिन्दीतही करण्यांत आली होती.

सामायिक करा :

भक्त प्रल्हाद - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती