रुक्मिणी हरण
१९३३

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१०९७६ फूट/१०० मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१२५५०/२४-८-३३

निर्मिती संस्था :इंपीरियल फिल्म कंपनी
दिग्दर्शक :नानासाहेब सरपोतदार
कथा :नानासाहेब सरपोतदार
पटकथा :नानासाहेब सरपोतदार
संवाद :नानासाहेब सरपोतदार
संगीत :गाडगीळ, प्राणसुख नाईक
छायालेखन :ए.पी.करंदीकर
गीतलेखन :नानासाहेब सरपोतदार
ध्वनिमुद्रक :बेहराम मर्झबान
नेपथ्य :मिस्त्रि मुनव्वर अलि
निर्मिती स्थळ :मुंबई
कलाकार :किशोरी, सखू, केशर, भाऊराव दातार, पंडितराव नगरकर, सुर्वे, पाटणकर, डी. बिलीमोरिया, गोकुळ जाधव, लानू मास्टर, ओमकार देवासकर, कामत
गीते :१) महाराजा भूपालानृप नायका, २) मधुसूदन वासूदेव, ३) शाम गोपि घेऊनिया, ४) हासत जणु आली हो, ५) जरी तो सुशील सुगुणा, ६) शोधित मी सखि राधा, ७) विधि नयनाला, ८) बालिका चळली ही, ९) सुंदरसा रूप गुणीं, १०) गुणसुंदरा अनुरूप भार्या, ११) सौंदर्यललना, १२) जरि कोपवी बलराम वीरा, १३) नाथ झणी या सोडवा, १४) कुलदेवते तुज प्रार्थना, १५) विफल वदन रिपु वाणी कुटिला.
कथासूत्र :राजा शिशुपाल याच्याशी रुक्मिणीचा विवाह निश्चित करण्यात आला होता.पण कृष्णाचे लोभसवाणे रूप आणि गुणांवर मोहित झालेली रुक्मिणी त्याच्याशी विवाहबद्ध होण्याची इच्छा मनीमानसी घेऊन बसली होती.हे कळताच कृष्णाने रुक्मिणीला सरळ पळवून नेले व तिच्याशी लग्नही केले.अशा रीतीने रुक्मिणी द्वारकाधीशाची पत्नी आणि द्वारकेची राणी झाली.
विशेष :मराठी आणि हिन्दीतही निर्माण केला होता. १९१२ साली एस्.एस्.पाटणकर, ए.पी.करंदीकर आणि व्ही. पी. दिवेकर ह्या त्रिमुर्तीने ‘‘सावित्री” नामक मूकपट बनविला होता. त्या त्रिमुर्तीपैकी ए.पी. करंदीकर यांनी ‘‘रूक्मिणीहरणाचे” छायाचित्रण केले होते व एस्.एन. पाटणकर यांनी एक भूमिका केली होती.

सामायिक करा :

रुक्मिणी हरण - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती