शिकलेली बायको
१९५९

सामाजिक
३५मिमी/कृष्णधवल/९२मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी२७०८७/१६-३-१९५९./यू

निर्मिती संस्था :सुरेल चित्र, कोल्हापूर
दिग्दर्शक :माधव शिंदे
कथा :कै. नाथमाधव (डॉक्टर कादंबरी)
पटकथा :दिनकर द. पाटील
संवाद :दिनकर द. पाटील
संगीत :वसंत प्रभू
छायालेखन :वसंत शिंदे
संकलक :वसंत शेळके
गीतलेखन :पी. सावळाराम
कला :पांडुरंग हावळ
रंगभूषा :दिनकर जाधव
वेषभूषा :विठ्ठल इंगवले
स्थिरचित्रण :श्याम सासणे
गीत मुद्रण :कौशिक
ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओज, कोल्हापूर
रसायन शाळा :प्रकाश लॅबोरेटरीज्, कोल्हापूर
पाहुणे कलाकार :वसंत शिंदे
कलाकार :उषा किरण, सूर्यकांत, इंदिरा चिटणीस, सुधा आपटे, नीलम, दादा साळवी, जोग, वसंत लाटकर, अमोल, गणपत पाटील, बापुसो. गावडे
पार्श्वगायक :लता मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर
गीते :१) हर्षाचा वर्षाचा दिवाळसण आला, २) आली हांसत पहिली रात, ३) नयनी गंगा हृदयी काशी, ४) देवावाणी शेत माझं नवसाला पावलं, ५) प्रेमा काय देऊ तुला?
कथासूत्र :कमलिनी जास्त शिकलेली आहे तेव्हा ती बायको नको असे रघुनाथ लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सांगतो.कमलिनी माहेरी परत येते.अपुरे राहिलेले शिक्षण पूर्ण करते आणि डॉक्टर होते.तिला सासऱ्याच्याच घरात दवाखान्याची जागा मिळते.एक दिवस बैलगाडीच्या शर्यतीत जखमी झालेल्या रघुनाथला कमलिनीच्याच दवाखान्यात आणतात.कमलिनीच्या शुश्रुषेने तो बरा होतो.त्याचा शिकलेल्या मुलींबद्दलचा गैरसमज दूर होतो.तसेच कमलिनी हीच आपली बायको हे त्याला कळते आणि तो तिचा आनंदाने स्वीकार करतो.
विशेष :शहरी-ग्रामीण वातावरणातील हे चित्र प्रचंड यशस्वी ठरले.

सामायिक करा :

शिकलेली बायको - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती