साताजन्माचा सोबती
१९५९

सामाजिक
३५मिमी/कृष्णधवल/१००मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी २८३४३/३०-९-१९५९./यू

निर्मिती संस्था :श्रीकृष्ण प्रॉडक्शन्स
दिग्दर्शक :अनंत माने
कथा :पु. भा. भावे
पटकथा :पु. भा. भावे
संवाद :पु. भा. भावे
संगीत :वसंत पवार
कलाकार :उषा किरण, रमेश देव, दामुआण्णा मालवणकर, लीला गांधी, चित्तरंजन कोल्हटकर, दादा साळवी, रत्नमाला
गीते :१) घे मिटुनी पाकळी फूला राजसा जोजविते मी तुला, २) पतिव्रतांमध्ये थोर सावित्री गं सती, ३) भातुकलीचा खेळ चिमुकला, ४) कैसी संगती झाली उन्हे, ५) अंतरीचे सुख गांठी गोवून ओठावरी नाचती, ६) निघाला मथुरेला यदुनाथ
कथासूत्र :प्रमिला आईविना एकुलती एक पोर म्हणून रावसाहेब तिला अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवतात.ती एम.ए.पर्यंत शिकते.त्यामुळे ती स्वतंत्र विचारांची होते. पुरुषांविरुद्ध बंड पुकारते.पैजेखातर मोहनराव मोहिते या इनामदाराशी ती लग्न करते.एकदा जत्रेत चुकलेली एक मुलगी तो घरी आणतो. प्रमिला तिला पुरुषद्वेष्टी बनविण्यासाठी प्रयत्न करते.पण चिमणीला नृत्य शिकवणारा बिंदुमाधव चिमणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतानाच मोहनराव येतो आणि तिला सोडवतो.प्रमिलेचे डोळे उघडतात आणि त्यांचा संसार सुखाने सुरु होतो.

सामायिक करा :

साताजन्माचा सोबती - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती