जान्हवी
१९५९

सामाजिक
३५मिमी/कृष्णधवल/८८मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी२८९६५/१८-१२-१९५९./यू

निर्मिती संस्था :शिवशक्ति चित्र
निर्माता :विश्वनाथ कामत
दिग्दर्शक :कामत, सोना पाठारे
कथा :वि. वा. शिरवाडकर
पटकथा :वि. वा. शिरवाडकर
संवाद :वि. वा. शिरवाडकर
संगीत :शंकरराव कुलकर्णी
छायालेखन :गणपत शिंदे, केणी
संकलक :व्ही. एस. राव
गीतलेखन :वि. वा. शिरवाडकर, शाहीर प्रभाकर
कला :श्रीकृष्ण आचरेकर
स्थिरचित्रण :आनंद आर्टस्, मुंबई
ध्वनिमुद्रक :रावळ, फडके
निर्मिती स्थळ :श्री साऊंड स्टुडियो, मुंबई
रसायन शाळा :रॅमनॉर्ड रिसर्च लॅबोरेटरीज, मुंबई
कलाकार :रेखा, विवेक, चित्तरंजन कोल्हटकर, वसंत शिंदे, लीला गांधी, कु. लेवी, नान् संझगिरी, माशेलकर, केणी, मधू आपटे, मंगेश कांबळी, विश्वास कुंटे
गीते :१) मायेला माऊली आंब्याची साऊली, २) तूच जीवनाधार देवा, ३) नंदकुमारा रे तुझी बांसरी, ४) देव न राही देवळांत, ५) प्रीत कुणा कंच्या वाईट येळी घडली, ६) अंधार अंधार अंधार जगी दाटला

कथासूत्र :जान्हवी बालविधवा असते.पतीच्या मृत्यूनंतर ती वडिलांच्या घरी येते.पण थोड्याच दिवसात वडीलही मृत्यू पावतात.तेव्हा एक महंत तिला आश्रय देतात .अचानक एक चित्रकार जान्हवीच्या आयुष्यात येतो आणि ते दोघे प्रेमात पडतात.हे पाहून महंत अस्वस्थ होतात.आतापर्यंत ज्या मनोविकाराना त्यांनी ताब्यात ठेवलेलं असतं,ते आता मुक्त होऊ पाहतात.चित्रकार जान्हवीला वाचवतो.नैतिक अधःपाताचा पश्चाताप झालेले महंत धगधगत्या झोपडीत स्वतःच्या जीवनाची इतिश्री करून घेतात.
विशेष :वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘जान्हवी’ या कादंबरीवरून बेतलेला.

सामायिक करा :

जान्हवी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती