कीचक वध
१९५९

पौराणिक
३५मिमी/कृष्णधवल/११३मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी२८१७१/२-९-१९५९./यू

निर्मिती संस्था :माणिक चित्र
निर्माता :पी. के. (बाळासाहेब) पाठक
दिग्दर्शक :यशवंत पेठकर
कथा :ग. दि. माडगूळकर
पटकथा :ग. दि. माडगूळकर
संवाद :ग. दि. माडगूळकर
संगीत :मा. कृष्णराव
छायालेखन :ई. महंमद
संकलक :बाबूराव लिमये
गीतलेखन :ग. दि. माडगूळकर
कला :बाळासाहेब थत्ते
रंगभूषा :जावडेकर
वेषभूषा :बकस, गणपत
नृत्य दिगदर्शक :बद्रीप्रसाद
स्थिरचित्रण :अनंत आगाशे
रसायन :एम्. डी. वाडदेकर
ध्वनिमुद्रक :शरद आपटे
निर्मिती स्थळ :प्रभात स्टुडिओज, पुणे
कलाकार :सुमति गुप्ते, शोभना समर्थ, बाबूराव पेंढारकर, विश्वास कुंटे, विमलाकुमारी, किरण, गणपतराव केळकर, सुदर्शन, प्रभाकर मुजुमदार, मदनमोहन, किसनराव, प्रभाकर नायक, भंडारी, महंमद, चूर्णवाला, राजा कामतेकर, गोल्डस्टाईन, हेलन
पार्श्वगायक :लता मंगेशकर, मन्ना डे, सुधीर फडके
गीते :१) सभेत भरल्या विवस्त्र झाली पांचाली सुकुमार, २) आदिशक्ती आदिमाये तूच एक आधार, ३) असा नेसून शालू हिरवा, ४) कळ्या फुलांची माझी लेणी फुलराणी मी फुलराणी, ५) उपवर झाली लेक लाडकी लग्नाला आली, ६) सांगू कुणा सांगू कुणा रे कृष्णा अंतरीच्या वेदना, ७) धुंद मधुमती रात रे नाथ रे

कथासूत्र :वनवासाची बारा वर्षे संपल्यानंतर एक वर्षाच्या अज्ञातवासासाठी पांडवांनी विराटाकडे आश्रय घेतला.धर्मराज पुरोहित म्हणून,द्रौपदी सुदेष्णेची दासी,भीम आचारी,अर्जुन नर्तक अशा विविध भूमिका ते बजावू लागले.विराट हा नुसता नावाचा राजा होता.मत्स्यदेशाचं खरं बळ होतं सेनापती कीचक.त्याने सैरंध्रीची(द्रौपदीची) मागणी केली.धडधडत्या अंतःकरणाने कीचकाकडे ती गेली.पण तिने शिताफीने सुटका करून घेतली.शेवटी भीमाने कीचकाच्या वागण्याचा सूड घेतला
विशेष :हेलनचा पहिला मराठी चित्रपट.

सामायिक करा :

कीचक वध - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती