पतिव्रता
१९५९

सामाजिक
३५मिमी/कृष्णधवल/ मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी२८७१४/४-११-१९५९./यू

निर्मिती संस्था :आल्हाद चित्र, पुणे
निर्माता :दत्ता धर्माधिकारी
दिग्दर्शक :दत्ता धर्माधिकारी
कथा :मधुसूदन कालेलकर
पटकथा :मधुसूदन कालेलकर
संवाद :मधुसूदन कालेलकर
संगीत :राम कदम
छायालेखन :बाळ बापट
संकलक :अनंत धर्माधिकारी
गीतलेखन :मधुसूदन कालेलकर
कला :केशव महाजनी
रंगभूषा :नाना जोगळेकर
वेषभूषा :फ्रान्सीस फर्नांडीस
स्थिरचित्रण :पाटील सिने पब्लिसिटी, परळ
गीत मुद्रण :कौशिक, मिनू कात्रक, परमार
रसायन :दत्ता पवार
ध्वनिमुद्रक :सुरेंद्र पेडणेकर
निर्मिती स्थळ :सेंट्रल स्टुडिओ, ताडदेव (मुंबई)
कलाकार :सुलोचना, चंद्रकांत, जयश्री गडकर, सूर्यकांत, विवेक, वसंत शिंदे, इंदिरा चिटणीस, नीलम, राजा नेने आणि दामुअण्णा मालवणकर, बाल कलाकार-अमेरंद्र, छाया प्रतिभा
पार्श्वगायक :भीमसेन जोशी, लक्ष्मीशंकर, आशा भोसले, जानकी अय्यर
गीते :१) घन घन घन भाग, २) ऐरी माई आज शुभमंगल गाओ, ३) रस बरसत, अमृत वीणा, ४) पिया बिन नाही आवत चैन, ५) सांगू कसं रे मी तुला सांगना, ६) चंद्रा तुझीच मी रोहिणी, ७) गाऊ कोणते गीत रसिका गाऊ कोणते गीत, ८) संपले जीवन संपली ही गाथा
कथासूत्र :कांत आणि कांता यांचा संसार दृष्ट लागण्याजोगा चालला होता.कांत हा एक मोठा गवई होता.पण कांताला मात्र गाण्यात मुळीच रस नव्हता.संसार हेच तिचे सर्वस्व होते.एक दिवस गुरूच्या पुण्यतिथीच्या दिवशी सुधा आणि कांत यांची जुगलबंदी होते.सुधा हरते,पण आपल्या गोड आवाजाने ती कांतला जिंकते.ती कांतकडे शिकवणीसाठी येते.पुढे कांत आणि सुधा लग्न करतात.तेव्हा या गोष्टीचा मुलांवर परिणाम होऊ नये म्हणून विधवेचं जिणं जगत स्वतःच्या कर्तबगारीवर कांता मुलांना वाढवते.इकडे सुधा कांतला सोडून देते आणि एका चित्रकाराबरोबर पळून जाते. कांतला पश्चाताप होतो.कांता मोठ्या मानाने त्याचा स्वीकार करते.पण....

सामायिक करा :

पतिव्रता - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती