सावित्री
१९३६

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१३८३७ फूट/१२१ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १५७०८/३१-१-३६

निर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन
दिग्दर्शक :भालजी पेंढारकर
कथा :भालजी पेंढारकर
पटकथा :भालजी पेंढारकर
संवाद :भालजी पेंढारकर
संगीत :सुरेशबाबू माने
छायालेखन :मधुसूदन पुरोहित
संकलक :बी.एस्.राऊत
गीतलेखन :भालजी पेंढारकर
रंगभूषा :वाटेगांवकर, मिरजकर, गोखले
ध्वनिमुद्रक :दादासाहेब तोरणे, कानिटकर
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :लीला चंद्रगिरी, माधवराव काळे, कृष्णराव गोरे, देवदास रानडे, वसंतराव पहेलवान, वेदपाठक, दिनकर ढेरे, विनयचंद्र, बकरे, पुराणिक, सरस्वती, रजनी, विजयादेवी
गीते :१) गोड बोल बहु बोबडे, २) या काय वदन प्रतिमा गुण, ३) आदि दैवता जग पालका, ४) चरणी तुझ्या महादेवा, ५) रम्य ही वनदेवी, ६) हांसे बोल हे वन पतीप्रेम भावे, ७) प्रभो हा खेळ केला भयें, ८) तव देव प्रभुराज सेवा, ९) सेवा बलाने नाथ हाकेला, १०) चपळ ही चपळ गति बाला, ११) सदैव धैर्य धरूनी, १२) प्रभुराया पदी प्रार्थना.
कथासूत्र :आंधळा राजा द्युमनसेन याचे राज्य जाते. तो आपली पत्नी व मुलगा सत्यवान यांच्यासह रानात जाऊन राहू लागतो.राजकन्या सावित्री सत्यवानाला पती म्हणून मनोमन वरते.पण सत्यवानाला अवघ्या एका वर्षात मृत्यू येणार असतो.त्यामुळे नारद सावित्रीला तिच्या निश्चयापासून परावृत्त करू पाहतात.पण सावित्री सत्यवानाशीच लग्न करते आणि श्रद्धा,सचोटी यांच्या बळावर त्याचे प्राण परत आणते.
विशेष :यमराजाची काळीकभिन्न प्रचंड आकृति आणि त्याच्यासमोर अत्यंत लहान दिसणारी सावित्री हे चित्रपटातील मायावी चित्रण बघून प्रेक्षक थक्क होत असत. चित्रपट समीक्षकांनी या दृश्याची तुलना हॉलिवुडच्या ‘‘किंगकाँग” या बोलपटातील दृश्याशी केली होती.

सामायिक करा :

सावित्री - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती