छाया
१९३६

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/१३५४० फूट/१२२ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १६५८३/६-८-३६

निर्मिती संस्था :हंस पिक्चर्स
दिग्दर्शक :मा. विनायक
कथा :वि. स. खांडेकर
पटकथा :र. शं. जुन्नरकर
संवाद :वि. स. खांडेकर
संगीत :आण्णासाहेब माईणकर, धम्मनखान
छायालेखन :पांडुरंग नाईक
गीतलेखन :वि. स. खांडेकर
ध्वनिमुद्रक :एन्. एल्. रंगैया
ध्वनिमुद्रिका :एच.एम.व्ही. रेकॉर्ड कंपनीने एच्.एम्.व्ही आणि मेघाफोन लेबलवर रेकॉर्डस् काढल्या होत्या.
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :रत्नप्रभा, लीला चिटणीस, इंदिरा वाडकर, मा. विनायक, बाबूराव पेंढारकर, हर्डीकर वैशंपायन, अनंत मराठे, नि.गो.पंडितराव
गीते : १) शाम माझा पाहिला, २) अंधार चढे जरि चोहिकडे, ३) रुणुझुणु गाई गाना, ४) चल लगबग शुभ घटिका, ५) यज्ञीं देऊनि ज्यांनी, ६) हळु हांस हांस तिमिरा, ७) कंपित का तव काया, ८) धावुं नको रे धननीळा, ९) चल आता ये, १०) धनहीना ललनांना, ११) प्रभुराया अपुला सारा, १२) निशिदिनी जीव जळे हा.
कथासूत्र :प्रकाश हा उमेदीचा उदयोन्मुख लेखक.पण त्याच्या वडिलांनी केलेल्या गुन्ह्याचे परिणाम त्याला आणि त्याच्या बहिणींना भोगावे लागतात.छाया ही श्रीमंताघरची लाडात वाढलेली लेक प्रकाशच्या लिखाणावर खूष होऊन त्याच्यावर प्रेम करू लागते.पण तिला जेव्हा त्याचा भूतकाळ कळतो,तेव्हा छाया प्रकाशलाच गुन्हेगार ठरवते आणि त्याला सोडून जाते.शेवटी छायाचा गैरसमज दूर होतो आणि तिला आपली चूक कळून येते.
विशेष :गोहर गोल्ड कमिटीचे १९३६ सालच्या सर्वोत्तम चित्रकथेसाठीचे सुर्वणपदक श्री. वि. स. खांडेकर यांना ‘‘छाया’’ या चित्रपटासाठी मिळाले. बोलपट सृष्टीतले पहिले पारितोषिक.

सामायिक करा :

छाया - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती