संत तुकाराम
१९३६

संतपट
३५ मिमी/कृष्णधवल/११७९५ फूट/११० मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १६८८४/२९-१०-३६

निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :विष्णूपंत दामले, साहेबमामा फत्तेलाल
कथा :शिवराम वाशीकर
पटकथा :शिवराम वाशीकर
संवाद :शिवराम वाशीकर
संगीत :केशवराव भोळे
छायालेखन :व्ही. अवधूत
गीतलेखन :शांताराम आठवले आणि तुकारामाचे मूळ अभंग
कला :साहेबमामा फत्तेलाल
ध्वनिमुद्रक :शंकरराव दामले
ध्वनिमुद्रिका :एच.एम.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :पुणे
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी, पुणे
कलाकार :विष्णूपंत पागनीस, गौरी, बी. नांद्रेकर, भागवत, शंकर कुलकर्णी, पंडित दामले, कुसुम भागवत, शांता मुझुमदार, मा. छोटू
गीते :१) आणिक दुसरें मज नाही आता, २) कुडचा भर नीर, ३) म्हायेराची मंगळाई, ४) तुका झाला सांज, ५) चालली ज्वानी वाया, ६) वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरें, ७) जोडोनिया धन उत्तम वेव्हारें, ८) दूध भात घृत साकर पारे, ९) भिक्षापात्र अवलंबिणे, १०) सदा माझे डोळा, ११) आधीं बिज एकले, १२) ढगावाचून आभाळ, १३) कोंबडा घाली साद, १४) क्षुधेलिया अन्न, १५) बैस अशी माझ्यापाशी, १६) विषयीं विसर पडला, १७) निशिंदिनी हरिचा, १८) तुका म्हणे तोचि संत, १९) दंड अन्यायाच्या माथा, २०) वेद अनंत बोलिला, २१) माझी मजा आली, २२) आम्ही तेणे सुखी, २३) कुल धर्म ज्ञान, २४) नाम घेता उठाउठी, २५) ना देखावे डोळा, २६) फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, २७) वानूं किती रे सदया, २८) पैल आले हरी, २९) आम्ही जातो आमुच्या गावा.
विशेष :व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखल झालेला पहिला मराठी चित्रपट. या महोत्सवामधे जगातील तीन सर्वोत्तम चित्रपटामधे या चित्रपटाची निवड होऊन “व्हेनिस वल्र्ड ट्रॉफी’’ मिळाली भारताचे व्हाइसरॉय “लिन लिथ गॉव्ह’’ यांनी “तुकाराम’’ पाहिला. केंब्रिज विद्यापीठाच्या चित्रपटकला अभ्यास मंडळाने “तुकाराम” ची प्रत मागिवली. शांतारामबापूंनी संकलन करून पाच हजार फुटाची इंग्रजी सबटायटल प्रत पाठविली. केब्रिंजनें It is good human document असा अभिप्राय दिला. ‘तुकाराम’ मधील ‘आधी बीज एकले’ हा अभंग शांताराम आठवले यांचा होता. पण संत साहित्याच्या अभ्यासकांनाही तो तुकारामाचाच वाटला.

सामायिक करा :

संत तुकाराम - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती