पुंडलिक
१९३६

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२६५० फूट/११२ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १६३७३/२५-६-३६

निर्मिती संस्था :पारिजात पिक्चर्स
निर्माता :हरिभाऊ मोटे
दिग्दर्शक :वामनराव भट, विश्राम बेडेकर
कथा :विश्राम बेडेकर
पटकथा :विश्राम बेडेकर
संवाद :सूर्यकांत पंडित
संगीत :मास्टर मोहिते (अविनाश)
छायालेखन :पोंक्षे, मराठे
गीतलेखन :एस्. बी. शास्त्री
कला :प्रल्हाद जितकर
ध्वनिमुद्रक :एन्.व्ही.काळे
निर्मिती स्थळ :सांगली
कलाकार :मा. मोहिते (अविनाश), बाळकोबा गोखले, दामुअण्णा मालवणकर, काका केणी, परशुराम सामंत, मा. दिनानाथ, प्रेमा बोरकर, नलिनी नागपूरकर, प्रेमा सामंत, जैतूनबाई
गीते : १) है बसेरा चार दिनका, २) रंग खुले मजेदार पहा, ३) केला मदनाने मजवरी वार, ४) महालि तुम्ही या, ५) तिन्ही सांजची नको गं, ६) काय हे झाले मजला, ७) हंसारे राजा, ८) चल उचल पाऊल, ९) मी अभागी अधमना, १०) मन रे जगकी झूठी माया, ११) गा हो प्रभूगुणां गा, १२) कैवल्याचे धाम देवराजा, १३) एक भरोसा प्रभु तेरो नाम, १४) महाली तुम्ही या या सखया.
कथासूत्र :श्रीमंतीमुळे डोळ्यांवर धुंदी चढलेला पुंडलिक गर्वोन्मत्त होतो.त्या धुंदीत तो आईवडिलांचाही आदर करीत नाही.कालांतराने त्याची सारी संपत्ती जाते.त्याच्यावर भीक मागून जगण्याची पाळी येते,तेव्हा त्याचे डोळे उघडतात.तो घरातून निघून गेलेल्या आईवडिलांचा शोध घेतो.त्यांची सेवा करता करता देवाची सेवा करू लागतो.पुंडलिकात विलक्षण बदल घडून येतो.त्याची विष्णुभक्ती पाहून त्याचे नाव विष्णूबरोबर जोडले गेले ते कायमचेच!
विशेष :मूळ पुस्तिकेवर निर्मात्याचे नाव नाही तसेच दिग्दर्शकाचे नाव नाही - पण विश्राम बेडेकरांच्या आत्मचरित्रांत निर्माता हरिभाऊ मोटे व दिग्दर्शक वामनराव भट व विश्राम बेडेकर असा उल्लेख आहे.

सामायिक करा :

पुंडलिक - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती