निर्मिती संस्था :शालिनी सिनेटोन
दिग्दर्शक :बाबूराव पेंटर
कथा :नारायण हरी आपटे
पटकथा :विष्णूपंत औंधकर
संवाद :विष्णूपंत औंधकर
संगीत :गोविंदराव टेंबे
छायालेखन :के.व्ही.माचवे
कला :गणपतराव वडणगेकर
ध्वनिमुद्रक :जी.एल्.काळे
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :विष्णूपंत औंधकर, झुंजारराव पवार, गोपाळ मांढरे (चंद्रकांत), वसंत ठेंगडी, राजा परांजपे, पुणेकर, अमीरखान पहेलवान, अमीना, सरदारबाई, बाळूबाई, मेहबूब जान, केशवराव दाते, मधू भोसले, विष्णूपंत जोग
गीते :१) सबसे राम भजन कर लेना, २) गरा गरा फिरवी नेत्र, ३) सोन्याच्या गं कुंचीवरी, ४) सोडी पदर जाऊ दे, ५) ये रि सखि आयो सावन, ६) प्रीतिची वाट कांटेरी, ७) कोपली भवानी आई.
कथासूत्र :पूर्वीच्या काळातल्या सावकारी पद्धतीवर प्रकाश टाकणारा चित्रपट.सावकार गरीब लोकांना लुटत;त्यामुळे एका सुखी शेतकरी कुटुंबाला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.अन्याबा हा शेतकरी आपला मुलगा हरी याच्या लग्नानिमित्त सावकाराकडून कर्ज काढतो.हे कर्ज सावकार अमानुषपणे वसूल करतो.त्यातच अन्याबाचा मृत्यू होतो तर हरीला तुरुंगवास पत्करावा लागतो.त्यातूनच खेडेगावात सावकारीविरुद्ध जागृती होते.
विशेष :पंडित जवाहरलाल नेहरू, सरोजिनी नायडू सारख्या पुढा-यांनी चित्रपट पाहून गौरवोद्गार काढलेला मराठीतील पहिला वास्तववादी चित्रपट.
चित्रपट हे कॅमे-याचे माध्यम आहे याची जाणीव आणि अत्यंत वास्तव वातावरण निर्मिती असलेला पहिलाच वास्तववादी चित्रपट. मुंबईतल्या एका गिरणीच्या दृष्याने हा चित्रपट सुरू होतो.