राम राम गंगाराम
१९७७

विनोदी
३५ मिमी/रंगीत/११९मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी८४२८८/११-५-१९७७./यू

निर्मिती संस्था :दादा कोंडके प्रॉडक्शन्स
निर्माता :दादा कोंडके
दिग्दर्शक :दादा कोंडके
कथा :राजेश मुजुमदार
पटकथा :राजेश मुजुमदार
संवाद :राजेश मुजुमदार
संगीत :रामलक्ष्मण
छायालेखन :अरविंद लाड
संकलक :एन. एस. वैद्य
गीतलेखन :दादा कोंडके, राजेश मुजुमदार
कला :दिनानाथ चव्हाण
रंगभूषा :दिनकर जाधव
केशभूषा :चांदबिबी
वेषभूषा :विठ्ठलराव इंगवले
नृत्य दिगदर्शक :मनोहर नायडू, बद्रीप्रसाद, सोहनलाल, उषा चव्हाण
स्थिरचित्रण :स्टुडिओ तुही निरंकार
गीत मुद्रण :बी.एन.शर्मा
ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार, माधव पाताडे
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओ, कोल्हापूर
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज
कलाकार :दादा कोंडके, उषा चव्हाण, अशोक सराफ, धुमाळ, अंजना, रत्नमाला, मोहन कोठीवान, आशा पाटील, दिनानाथ टाकळकर, मा.भगवान, कुंदनकुमार
पार्श्वगायक :उषा मंगेशकर, महेंद्र कपूर
गीते :१) आला महाराज सोबत बेंडबाजा कुणी म्हणे आला यमराज करु दुनियेवरती राज, २) रुपानं देखणी रंगांन चिकणी कोकीळेचा गळा गं बाई माझ्या बकरीचा समद्यास्त्री लागलाय लळा, ३) मनांत मन तुझ्या गुतलय सांर एकांती चल तुला सांगतेय खरं, ४) गालावरती खळी तुझ्या लावी येडं मला कसं सांगू एक मोका दे, ५) नाकी डोळी छान रं गोरा गोरा पान तत आलं तरुणपणा मिरवायला कुणीतरी न्या हो मला मिरवायला, ६) गंगु तारूण्य तुझ बेफाम जसा इष्काचा अॅीटमबॉम
कथासूत्र :गंगाराम हा मनाचा प्रेमळ माणूस.त्याचे मामा वारल्यानंतर तो एकदम लक्षाधीश बनतो.तो मुंबईला येतो,पण श्रीमंतीचा बडेजाव सांभाळता सांभाळता थकून जातो.गोंधळून जातो.त्याचवेळेस गंगी तिथे येते आणि गंगारामला सावरते.पण श्रीमंतीची एक एक थेरं पाहता गंगारामला या श्रीमंतीचा वीट येतो आणि तो गंगीसह गावी निघून जातो.

सामायिक करा :

राम राम गंगाराम - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती