पारध
१९७७

सामाजिक
३५ मिमी/रंगीत/९५मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी८६१९७/५-१२-१९७७./यू

निर्मिती संस्था :शिवशक्ति प्रॉडक्शन्स
निर्माता :किशोर मिस्किन
दिग्दर्शक :किशोर मिस्किन
कथा :मधुसूदन कालेलकर
पटकथा :मधुसूदन कालेलकर
संवाद :मधुसूदन कालेलकर
संगीत :राम कदम
छायालेखन :प्रताप दवे
संकलक :पांडूरंग खोचीकर
गीतलेखन :ग. दि. माडगूळकर, जगदीश खेबुडकर, वंदना विटणकर, मधुसुदन कालेलकर
कला :शरद पोळ
रंगभूषा :ताम्हाने, मोहन
वेषभूषा :किसन
नृत्य दिगदर्शक :चेतनकुमार, सरोज
स्थिरचित्रण :कलर लॅब
ध्वनिमुद्रक :रघुवीर दाते
ध्वनिमुद्रिका :एच.एम.व्ही.रेकॉर्ड कंपनी, मुंबई
विशेष चित्रण :पै
रसायन शाळा :रॅमनॉर्ड लॅबोरेटरीज
कलाकार :नूतन, सचीन, सारिका, रमेश देव, धुमाळ, गजानन जागीरदार, श्रीकांत मोघे, नंदा जयराज, ललिता कुमारी, जगदीश राज, कान मोहन, मीना टी, श्रीराम लागू
पार्श्वगायक :पुष्पा पागधरे, चंद्रशेखर गाडगीळ, सुमन कल्याणपूर
गीते :१) कैक मैफली आल्या गेल्या, २) मी नीच परंतू ती नव्हे, ३) अजून आठवे ती रात पावसाळी, ४) येना सजली स्वप्ने नयनी
कथासूत्र :गहाण पडलेला वाडा सोडवण्यासाठी सुनील प्रेयसी सीमाशी लग्न करण्याचा विचार बाजूला ठेवून नोकरीनिमित्त बाहेर पडतो. योगायोगाने तो एका धनाढ्य माणसाचा जीव वाचवतो;त्यामुळे तो माणूस त्याला नोकरी देतो.पण थोड्याच दिवसात या लोकांचा धंदा कोणता हे सुनीलला कळून चुकतं.वाड्यातील रत्नजडीत मूर्ती आणून दिल्यास त्याची,त्याच्या आईची व प्रेयसीची सुटका करण्याचे ते वचन देतात.पण अचानक परिस्थिती बदलते.स्मगलर्स पकडले जातात व सुनील-सीमाचं मिलन होतं.
विशेष :हिंदी चित्रपटातील विख्यात अभिनत्री नूतन यांची नायिकेची भूमिका असलेला पहिला मराठी चित्रपट. हिंदी चित्रपटातील अभिनेत्री सारिका व अभिनेते जगदिशराज याचेही मराठी रजतपटावर प्रथम दर्शन. हिंदी मराठी दोन्ही भाषेत

सामायिक करा :

पारध - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती