देवकीनंदन गोपाळा
१९७७

संतपट
३५ मिमी/रंगीत/१२०मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी८६४४०/३१-१२-१९७७./यू

निर्मिती संस्था :अक्षर फिल्म इंटनॅशनल
निर्माता :डॅडी देशमुख
दिग्दर्शक :राजदत्त
कथा :गो. नी. दांडेकर
पटकथा :ग. दि. माडगूळकर, विठ्ठल वाघ
संवाद :ग. दि. माडगूळकर, विठ्ठल वाघ
संगीत :राम कदम
छायालेखन :मनोहर आचार्य
संकलक :रामराव घाटके
गीतलेखन :ग. दि. माडगूळकर, विठ्ठल वाघ, डॅडी देशमुख
रंगभूषा :निवृत्ती दळवी
वेषभूषा :रामभाऊ शिंगणारे
स्थिरचित्रण :चिमासाहेब घोरपडे
गीत मुद्रण :बी.एन. शर्मा (बॉम्बे साऊंड सर्व्हिसेस), कौशिक (फिल्म सेंटर),
ध्वनिमुद्रक :रघुनाथ अवसरे, मिनूबाबा
ध्वनिमुद्रिका :मंगेश देसाई
रसायन शाळा :बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज
कलाकार :डॉ. श्रीराम लागू, आशा पोतदार, सुहासिनी देशपांडे, नीलम संजीवनी बीडकर, विठ्ठल पणदूरकर, विनय काळे, विश्वास कुंटे, आनंद माडगूळकर, नाना पळशीकर, रमेश देव, सीमा
पार्श्वगायक :सुधीर फडके, रश्मि गाडगीळ, उषा मंगेशकर, पुष्पा पागधरे, राम कदम, चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर गाडगीळ, वाघमारे, मल्लेश, आशा भोसले, मन्नाडे, भीमसेन जोशी
गीते :१) छिन्नी हातोड्याचा घाव करी दगडाचा देव, २) कान्हा गोकुळात आला, ३) लाजू नको लाजू नको जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल हो घबाड मिळी दे, ४) तुमच्या तोंडाला कुलप का घातली! ५) सांभाळी ही तुझी लेकरे पुण्य समजती पापाला, ६) विठ्ठलाये पायी थरारली वीट राऊळीची धार निनादली
कथासूत्र :वऱ्हाडातील भुलेश्वरी नदीच्या कुशीत वसलेल्या शेणगावातील झिंगराजी परीटाच्या घरात ठेवूजीचा जन्म झाला.त्यानेच पुढे समाजाला मार्ग दाखवला.उभा महाराष्ट्र त्याला ‘गाडगे महाराज’ म्हणून ओळखू लागला.’गोपाळा गोपाळा’च्या तालावर जनता जनार्दनाला डोलायला लावणाऱ्या या अलौकिक व्यक्तिमत्वाच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा चित्रपट.

सामायिक करा :

अधिक माहिती