जैत रे जैत
१९७७

ग्रामीण
३५ मिमी/रंगीत/८२मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी८६४२२/२८-१२-१९७७./यू

निर्मिती संस्था :महालक्ष्मी चित्र
निर्माता :उषा मंगेशकर
कथा :गो. नी.दांडेकर
पटकथा :सतीश आळेकर, अनिल जोगळेकर
संवाद :सतीश आळेकर, अनिल जोगळेकर
संगीत :हृदयनाथ मंगेशकर
छायालेखन :विनोद प्रधान
संकलक :एन.एस.वैद्य
गीतलेखन :ना. धों. महानोर, सतीश आळेकर
कला :टी. के. देसाई
रंगभूषा :निवृत्ती दळवी
वेषभूषा :भसाळे
स्थिरचित्रण :राव
गीत मुद्रण :वली समरेंद्रनाथ, गुप्ता, मिनू कात्रक, सूद
रसायन शाळा :नवरंग सिने सेंटर, फिल्म सेंटर
कलाकार :मोहन आगाशे, स्मिता पाटील, सुलभा देशपांडे, कामिनी, नारायण पै, सुशांत रे, निळू फुले, चंद्रकांत काळे, मंजिरी, राम रानडे, मिना, बाळ कर्वे, सीमा, श्रीराम पेंडसे, अनंत कुलकर्णी, दिलीप मंगळवेढेकर, अरविंद ठकार
पार्श्वगायक :लता मंगेशकर, आशा भोसले, रविंद्र साठे, उषा मंगेशकर, वर्षा भोसले, चंद्रकांत काळे
गीते :१) डोंगर कपारी ठाकरवाडी २) आम्ही ठाकर ठाकर ह्या रानाची पाखरं, ३) वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाची पारी ४)गोर्या देहावरती कांती नागिणीची कात, ५) जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजे जी, ६) मी रात टाकली मी कात टाकली, ७) राधे गो राधे का आरडलीस ग, ८) नभ उतरू आलं चिंब थर्थर ओल, ९) कोण्या राजानं राजानं शेवटी खंदली १०) पीक करपले पक्षी दूरदेशी गेले, ११) लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला १२) हा ढोलिया कुणाच्या अध्यात नही नही
कथासूत्र :शंकराच्या पिंडीच्या आकाराचा लिंगोबा म्हणजे साक्षात शंकर यावर साऱ्या ठाकरवाडीचा विश्वास असतो.भगत आपला मुलगा नाग्याला एकदा सांगतो.’लिंगोबावर जी पोळ्यांची माळ आहे ती साक्षात शंकराच्या गळ्यातली माळ.त्यात राणी माशी राहते.ती फक्त पुण्यावंतालाच दिसते.’तेव्हापासून नाग्या बापाने सांगितलेली सारी पथ्यं पळून पुण्यवंत व्हायचं ठरवतो.तो वागतोही तसं.पण तरीही त्याचा बाप साप चावून तडफडत मरतो.तो झाडाची फांदी तोडत असतानाच माशा त्याला चावतात व विद्रूप करतात.नाग्याची श्राद्धाच उडते.तो व त्याची प्रेयसी चिंधी मिळून राणी माशीचा सूड घेतात.

सामायिक करा :

अधिक माहिती