राधा-मोहन अर्थात नंद के लाल
१९३४

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२६१५ फूट/१४१ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१३२०५/८-३-३४

निर्मिती संस्था :महालक्ष्मी सिनेटोन
दिग्दर्शक :नानूभाई बी. वकील
कथा :पंडित उग्र
पटकथा :नानूभाई बी. वकील
संगीत :दिनकर एस्. बिडकर
छायालेखन :जी.के. मेहता
ध्वनिमुद्रक :सुंदर राणे
निर्मिती स्थळ :मुंबई
कलाकार :जुबेदा, शाहू मोडक, दिनकर बिडकर, पवार, गुलाब, मनूभाई इनामदार, रतिलाल, हिरोजी, यूसुफ, फातेमा बेगम, लीला, विजया
गीते :१) काय सांडले, कोण हरवले, २) काळ वेळ ही दोन घडीची, ३) नंद महाशय, ४) विद्वान असे मी खरा, ५) बन्सीवाला नंदलाला, ६) डोळे उघडनी पाहा, ७) बन्सीवाला नंदलाला, ८) तुज सम रमणी जगी ना कोणी, ९) मधु बोला बोला, १०) जगी भुले भुले नंदलाल, ११) मधुर वचन बोले, १२) कृषीवलांचे धन न दुसरे, १३) कारे छळिसी मजला शाम, १४) माते समान माता, १५) बसलासि का स्तब्ध, १६) शाम चरण ध्यायी तू, १७) गोकुळवासी गवळणी, १८) ता-यांचे तीन रंग, १९) तुला पाहिजे पती पाच, २०) पती, सती, रती, विपत्ती येती नित्य घरी, २१) मही भार भारी झाला २२) मातृमूर्ति तू सकल जगाची २३) नंदलाल मुरलीवाला २४) तारक तू प्रभु.
कथासूत्र :श्रीकृष्णाच्या आयुष्यावरचा चित्रपट.राधा आणि कृष्ण यांची एकमेकांबद्दलची भक्ती,कंसवध वगैरे प्रसंगांचा यात समावेश आहे.
विशेष :भारतातील पहिला बोलपट ‘‘आलमआरा’’ मधील नायिका जुबेदा हिचा हा पहिला व शेवटचा मराठी बोलपट. जुबेदाची आई सुप्रसिद्ध अभिनेत्री व मूकपटाच्या जमान्यातील पहिली स्त्री निर्माती व दिग्दर्शक फातेमा बेगम हिनेही बोलपटातून काम केले होते. या चित्रपटांत वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शाहू मोडक यांनी कृष्णाची भूमिका केली होती.

सामायिक करा :

राधा-मोहन अर्थात नंद के लाल - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती