सुवर्ण मंदिर
१९३४

पोशाखी
३५ मिमी/कृष्णधवल/१४६१६ फूट/१३० मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१३७१५/१३-८-३४

निर्मिती संस्था :मेनका पिक्चर्स
दिग्दर्शक :मो.ग. रांगणेकर
कथा :मो.ग. रांगणेकर
पटकथा :मो.ग. रांगणेकर
संवाद :मो.ग. रांगणेकर
संगीत :रामनाथकर
छायालेखन :कांबळे
गीतलेखन :मो.ग. रांगणेकर
कला :आरोलकर
ध्वनिमुद्रक :टेलर
निर्मिती स्थळ :मुंबई
कलाकार :केशर वाडकर, गणपतराव बोडस, ज्योत्स्ना भोळे, दिनकर कामण्णा, नानासाहेब हर्डीकर, पद्मा शाळिग्राम, पाटकर, बळवंतराव परचुरे, बाबुराव मणेरीकर, हिराबाई बडोदेकर
गीते :१) भुलला कसा जीव, २) रमले तुझ्या चरणी, ३) नाही विसावा मज व्हावा, ४) मनी फुलला अहा आनंद, ५) आसरा ना दुजा, ६) मनमोहन राजस राया, ७) मन्मथाची होय पीडा, ८) तूच एक त्राता सकल जगी, ९) सुखविला जीव हा, १०)का नाही मनीं समाधान, ११) कोमल माझे फूल जीवाचे, १२) प्रिय बाळे झणी धाव घे, १३) हासे सखे नाचे अजी वसुधा ही.
कथासूत्र :चंडवर्मा आणि योगिनी हे पतिपत्नी अगदी भिन्न स्वभावाचे.चंडवर्मा नास्तिक तर योगिनी अगदी धार्मिक स्वभावाची.या दोघांची कन्या लालन.पण चंडवर्मा आणि योगिनीविभक्त होऊन कित्येक वर्षे लोटल्यामुळे लालन ही आपली मुलगी आहे, हे चंडवर्माला माहित नसते.चंडवर्मा लालनला पळवून आणतो व तिला तुरुंगात ठेवतो.ती राजपुत्राच्या प्रेमात पडते.या राजपुत्राने प्रार्थनेसाठी सुवर्णमंदिर बांधलेले असते.लालनचा राजपुत्राकडे असलेला ओढा पाहून चंडवर्मा धार्मिक बनतो आणि दोघांचं लग्न करून देतो.
विशेष :मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट गणपतराव बोडस यांचे बोलपटातील प्रथम काम. तसेच गान हिरा-हिराबाई बडोदेकर यांचे रूपेरी पडद्यावरील प्रथम पदार्पण. मराठी बरोबर हिन्दीतही हा बोलपट काढण्यातं आला होता.

सामायिक करा :

सुवर्ण मंदिर - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती