देवकी
१९३४

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२८७८ फूट/११७मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१३७२३/१६-८-३४

निर्मिती संस्था :इंपीरियल फिल्म कंपनी
दिग्दर्शक :नानासाहेब सरपोतदार
कथा :नानासाहेब सरपोतदार
पटकथा :नानासाहेब सरपोतदार
संगीत :प्राणसुख एम्. नायक
छायालेखन :ए.पी.करंदीकर
कला :मिस्त्रि मुनव्वर अलि
ध्वनिमुद्रक :सोराब बी. इराणी
निर्मिती स्थळ :मुंबई
कलाकार :डी. बिलीमोरीया, भाऊराव दातार, जी.आर.सँडो, जाधव, गोडसे, लानू मास्तर, ओमकार देवासकर, सुलोचना (रूबी मायर्स), दुलारी, कृष्णाबाई
गीते :१) चरणकमल नमितो प्रभू निजला कसा आज, २) सदय हृदय देवा, ३) बहु सुखदनाद, ४) गृहिणी सुशिला जी जाया, ५) घेई सुख सेवा, ६) प्रभु आठवा कोदंड, ७) हो सौख्य धाम, ८) पळ वेगे काळ, ९) किती गाऊं गुण कमलनयन रूचिरा, १०) बघ गोकुळीं उगवें रवि, ११) करि जो जो रे, १२) सुरां सुरां होई भारी.
कथासूत्र :आपली बहीण देवकीहिच्या आठव्या पुत्राच्या हातून आपला नाश होणार या बातमीने उद्दाम कंस बेचैन होतो.आपल्या होऊ घातलेल्या वैऱ्याचा निःपात करण्याच्या निश्चयाने कंस वसुदेव-देवकीला तुरुंगात डांबतो.पण जन्मतःच बाळकृष्णाला नंद-यशोदेकडे आणले जाते आणि कंसाचा कुटील डाव हुकतो.पुढे हाच कृष्ण कंसाचा यथावकाश वध करतो.
विशेष :मराठी बरोबर हिन्दीतही हा बोलपट काढण्यांत आला होता.

सामायिक करा :

देवकी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती