छत्रपती संभाजी
१९३४

ऐतिहासिक
३५ मिमी/कृष्णधवल/१४४१८ फूट/१३१ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी१४१२०/२१-१२-३४

निर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन
दिग्दर्शक :पार्श्वनाथ आळतेकर
कथा :द.का.काणे
पटकथा :द.का.काणे
संवाद :द.का.काणे
संगीत :अण्णासाहेब माईणकर
छायालेखन :शं.धो. पाटील
संकलक :र. द. थिटे
गीतलेखन :द.का.काणे
कला :ग. वि .वाटेगांवकर
गीत मुद्रण :लजपतराय
ध्वनिमुद्रक :लजपतराय
नेपथ्य :वि. धो. गोखले
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :मा. विठ्ठल, दादा साळवी, वसंतराव पहेलवान, जावडेकर, विजयादेवी, शकुंतला, किशोरी इंगळे, शाहीर नानिवडेकर, वर्णे, कांबळे, पाटील
गीते :१) घ्या मानूनी हा, २) ऐका ऐका संभाजी महाराजांच्या शौर्याला, ३) चमके पाणी मोत्यावाणी,४) फुलणार तों खुडिले कळीला.
कथासूत्र :संभाजीने आपल्या पक्षातील लोकांवर संशय घेतला व त्यामुळे त्याचे जे खरे मित्र होते,तेच शत्रू बनले.गणोजी शिर्के तर सूडभावनेनं नुसता पेटून उठला होता.तुळशी - जिनं संभाजीसाठी जीव टाकला - तीही मनात सूडभावना बाळगून होती.संभाजी तर कबजीच्या पूर्णपणे वर्चस्वाखाली गेला होता.संगमेश्वर मुक्कामी मुकबरखानानं संभाजीला अटक केली आणि औरंगजेबाकडे नेले.तो मुस्लिम धर्म स्वीकारत नाही,हे पाहून औरंगजेबाने त्याला हाल हाल करून ठार केले.
विशेष :मराठी चित्रपटातले पहिले संस्कृत भाषेतील गीत-‘‘क्रोधात् ज्वलन्ती’’ या चित्रपटात आहे. संभाजी राजांच्या वडूज येथील समाधीवर चित्रपट सुरू होतो. महाराज समाधीतून बाहेर येतात व घोडदौड सुरू होते. त्यावर श्रेयनामावली सुरू होते. तर शेवटी समाधीला कोल्हापूरच्या राजाराम महाराजांनी हार घातला असे दृश्य होते. सेन्सॉरने बरीच कापाकापी करून त्यातले नाट्य घालवून टाकले.

सामायिक करा :

छत्रपती संभाजी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती