अमृतमंथन
१९३४

पोशाखी
३५ मिमी/कृष्णधवल/१३९३४ फूट/१२५मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी १३८९६/१५-१०-३४

निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
कथा :ना.ह.आपटे
पटकथा :ना.ह.आपटे
संवाद :व्ही. शांताराम
संगीत :केशवराव भोळे
छायालेखन :केशवराव धायबर
संकलक :व्ही. शांताराम
गीतलेखन :शांताराम आठवले
कला :साहेबमामा फत्तेलाल
गीत मुद्रण :विष्णुपंत दामले
ध्वनिमुद्रक :विष्णुपंत दामले
ध्वनिमुद्रिका :एच.एम.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :पुणे
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी, पुणे
कलाकार :नलिनी तर्खड, शांता आपटे, सुरेशबाबू माने, केशवराव दाते, केळकर, वर्दे, कुलकर्णी, बुवासाहेब, देसाई, माने
गीते :१) असुरगण मर्दिनी, २) किती सुखदा येत निशा, ३) ही ललना न रूचिर गुणा, ४) गहन भव सरिता, ५) आली मुरकन राणी, ६) राही मम मानसांत, ७) दाही जिवा चिंतानल, ८) होई सुखद जगत, ९) संजीवन वनी वितरत, १०) सुवसना मोदमय, ११) रूचे येथे वास, १२) हाय दैवा काय दावा, १३) अमृत प्रकट झाले.
कथासूत्र :बुद्धधर्माचा सनातन धर्माशी होत असलेला संघर्ष हा या चित्रपटाच्या कथेचा गाभा आहे.नवमताचा पुरस्कर्ता राजा क्रांतीवर्मा आपल्या राज्यात यज्ञामध्ये नरबळी,पशुबळी बंद करण्याची घोषणा करतो.दरबारचा राजगुरू आणि सनातन धर्माचे पुरस्कर्ते याना हा निर्णय मान्य होत नाही.ते यशोधर्म नावाच्या पापभिरू माणसाकडून राजाची हत्या करवतात.पण या दुष्कृत्याबद्दल राजदरबारी यशोधर्माला देहांताची शिक्षा दिली जाते.क्रांतीवर्माची कन्या आणि यशोधर्माचा पुत्र माधवनाथ राजगुरूचा कपटीपणा आणि पाताळयंत्रीपणा उघड करतात.शेवटी सारे प्रजाजन राजगुरूंच्या कुटील राजकारणाला विटून क्रांती करतात.स्वतःच्या तत्वासाठी राजगुरू अखेरीस स्वहस्ते देवी चण्डिकेला आपला बळी देतो.
विशेष :भारतीय चित्रपटसृष्टीत या मराठी चित्रपटामध्ये पहिला मोठ्या स्वरूपाचा क्लोजअप दाखविला.

सामायिक करा :

अमृतमंथन - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती