निर्मिती संस्था :हंस चित्र
दिग्दर्शक :मास्टर विनायक
कथा :प्र.के.अत्रे
पटकथा :र.शं.जुन्नरकर
संवाद :प्र.के.अत्रे
संगीत :अण्णासाहेब माईणकर
पार्श्वसंगीत :बी.एस.हूगन
छायालेखन :पांडुरंग नाईक
गीतलेखन :प्र.के.अत्रे
कला :गांग नाईक
रंगभूषा :दातार, जावडेकर
वेषभूषा :घाणेकर
गीत मुद्रण :एच्.एम्.व्ही. रेकार्ड कंपनी, मुंबई, एच.एम.व्ही. आणि टिवन लेबलवर ध्वनी मुद्रिका काढण्यांत आल्या होत्या
ध्वनिमुद्रक :पी.एन्. अरोरा
निर्मिती स्थळ :फिल्म सिटी, (ताडदेव), मुंबई
कलाकार :रत्नप्रभा, इंदिरा वाडकर, नलिनी, शालिनी, रजनी, विनायक, जावडेकर, भाऊराव दातार, बाबूराव पेंढारकर व दादा साळवी
गीते : १) या हो घ्या हो कुणी माझी फुले ताजी घ्या हो, २) जीवा तूच विसावा,
३) एक जिवाला तळमळ लागे, ४) आता जगू कशाला, ५) खुसुखुसु आले हसूं, ६) शांतवाया मोहवाया निशा, ७) पहा हासत दिनकर आला.
कथासूत्र :लक्षाधीश दीनानाथ हा दीनदुबळे,निराधार यांचा आधार समजला जात असे.पण वास्तविक तो शेळीचं कातडं पांघरलेला लांडगा आहे हे कस्तुरी या फुलं विकणाऱ्या युवतीच्या लगेच लक्षात येत.कारण या तथाकथित थोर माणसाला तिच्या फुलांचं नसून तिचं आकर्षण असतं.त्याचा बुरखा फाडण्यासाठी मग कस्तुरी जगदीश या तिच्या मित्राकडून या धर्मवीराची सर्व पापी कृत्ये उजेडात आणते.
विशेष :पिलर्स ऑफ दि सोसायटी या इब्सेनच्या नाटकावर आधारीत. धर्मवीरची वेशभूषा बाबूराव पेंढारकरांनी पं. मदन मोहन मालवीयांच्या पोशाखाप्रमाणे ठेवली होती. हिन्दी आवृत्ती ही प्रदर्शित झाली होती