देवयानी
१९४०

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/११४११ फूट/१०८मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २२७८०

निर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन
दिग्दर्शक :पांडुरंग तेलगिरी
कथा :स.अ.शुक्ल
पटकथा :स.अ.शुक्ल
संवाद :स.अ.शुक्ल
संगीत :सुरेश बाबू माने
छायालेखन :पुरोहित, शिंदे
गीतलेखन :स.अ.शुक्ल
कला :आरोलकर
ध्वनिमुद्रक :अहलुवालिया
ध्वनिमुद्रिका :एच्.एम्.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :पद्मा शाळीग्राम, कुसुम देशपांडे, सुरेशबाबू माने, निंबाळकर, जयशंकर दानवे, दुधाळे, दिनकर कामण्णा
गीते :१) कलिके खुलला बघ, २) जयजय गुरुराज सदय, ३) उसळे जीवन-संगर घोर, ४) बाग फुलली हृदयाची, ५) कां सुखाचे स्वप्न, ६) सागर खवळे गरजत वारा, ७) रमवी मना आशा उषा, ८) साजणी माडूं नको गं, ९) खेळू या नाचू या, १०) रूसूं नको सखे कलिके बाई, ११) तू नयनाची चांदणी.
कथासूत्र :इंद्राच्या दरबारचे कवि शुक्राचार्य बृहस्पतीला मिळालेल्या मानसन्मानाने अपमानित होऊन देवांचे शत्रू दैत्य यांना मिळतात.तत्पूर्वी शिवाच्या वरदानाने त्यांनी संजीवनी विद्या प्राप्त करून घेतलेली असते.बृहस्पती पुत्र कच याला संजीवनी विद्या मिळविण्यासाठी शुक्राचार्यांकडे पाठवले जाते.शर्मिष्ठा कचावर मोहित असते.तिचा पिता दानवनृपती वैश्यपर्व कचाला वारंवार ठार करतो;पण संजीवनीमुळे तो दरवेळी जिवंत होतो.शेवटी कचाला मारून,जाळून त्याची रक्षा मद्यात मिसळून ते शुक्राचार्यांना दिले जाते.शुक्राचार्य कन्या देवयानी व कच एकमेकांवर अनुरक्त असतात.शुक्राचार्यांच्या मृत्यूनेच कच सजीव होतो व त्याला संजीवनी विद्या प्राप्त होते.

सामायिक करा :

देवयानी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती