संत ज्ञानेश्वर
१९४०

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१२५२६ फूट/११७ मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २२२५०

निर्मिती संस्था :प्रभात चित्र
दिग्दर्शक :विष्णूपंत दामले, साहेबमामा फत्तेलाल
कथा :शिवराम वाशीकर
पटकथा :शिवराम वाशीकर
संवाद :शिवराम वाशीकर
संगीत :केशवराव भोळे
छायालेखन :व्ही. अवधूत
संकलक :ए.आर.शेख
गीतलेखन :शांताराम आठवल
कला :साहेबमामा फत्तेलाल
ध्वनिमुद्रक :शंकरराव दामले
ध्वनिमुद्रिका :नॅशनल ग्रामोफोन कंपनी ऑफ इंडिया यांनी यंग इंडिया लेबलवर ध्वनी मुद्रिका काढल्या होत्या
निर्मिती स्थळ :प्रभात फिल्म कंपनी, पुणे
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी, पुणे
ट्रिक फोटोग्राफ :प्रल्हाद दत्त, आणि हरबन्स
कलाकार :शाहू मोडक, दत्ता धर्माधिकारी, ताम्हनकर, शांता मुजुमदार, सुमति गुप्ते, भागवत, सुंदराबाई, शंकर कुलकर्णी, वसंत ठेंगडी, मधुकर, पंडित, यशवंत, गोविंद, सुमित्रा, मालती, मंजू, गणपतराव, वसंत देसाई
गीते :१) समता वर्तावी अहंता, २) नित्य सुख घ्यावे, ३) बघ मंगल दिन आला, ४) आम्ही चकोर हरिचंद्रमा, ५) माता पिता बंधू जीविचा जिव्हाळा, ६) आम्ही दैवाचे दैवाचे शेतकरी रे, ७) एक तत्वनाम दृढ धरी, ८) सृष्टी न्हाली सोनियाने, ९) जयदेव जय योगीराजा, १०) आला रे हरि आला रे, ११) चरण देवा, १२) साधू बोध झाला, १३) सोनियाचा दिवस आजी अमृतें पाहिला. १४) ये म-हाठीचिये नगरीं, १५) दजें मन बुद्धी दूहिं, १६) उत्तमाने धरिले, १७) आनंद आनंद अवघा, १८) नाही तोचि काय नेणो असे
कथासूत्र :संन्यासाश्रमातून परत गृहस्थाश्रमात आलेल्या विठ्ठलपंतांना शुद्ध करून घेण्यास धर्मशास्त्रात आधार सापडत नाही.मुलांना याचा त्रास होऊ नये म्हणून ते पतिपत्नी देहांत प्रायश्चित्त घेतात.तरी ज्ञानेश्वर व त्याची भावंडं यांचा ब्राम्हणवर्गानं चालविलेला छळ चुकत नाही.चमत्कारानंतर बुद्धिप्रामाण्याचा बडिवार मिरवणाऱ्या ब्राह्मणांनाही अखेर मान तुकवावी लागली.बाहेरच्या सर्वमान्यतेनं घरचे ब्राम्हण पश्चात्तापदग्ध होतात.
विशेष :फ्रँक काप्रासारख्या विश्वविख्यात दिग्दर्शकाने तांत्रिक बाबीसाठी गौरवलेला एकमेव मराठी चित्रपट. हा चित्रपट न्यूयॉर्कमध्ये कार्नेजी हॉल थिएटरमधून दाखविण्यांत आला होता. असे शांताराम आठवलेनी ‘प्रभातकाल’ मध्ये लिहिले आहे. हा चित्रपट मराठी व हिन्दी मध्ये निर्माण करण्यात आला होता.

सामायिक करा :

अधिक माहिती