मोहिनी
१९४०

पोशाखी
३५ मिमी/कृष्णधवल/९८७८ फूट/११०मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २३०१७

निर्मिती संस्था :माय् पिक्चर्स
दिग्दर्शक :आण्णासाहेब राजोपाध्ये, मधुकर बावडेकर
कथा :कवि यशवंत
पटकथा :कवि यशवंत
संवाद :कवि यशवंत
संगीत :विश्वनाथबुवा जाधव
छायालेखन :के. माचवे, शंकरराव शिंदे
गीतलेखन :कवि यशवंत
ध्वनिमुद्रक :म्हामुळकर
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :इंडिया सिने लॅबॉरेटरी
कलाकार :उषा मंत्री, मा. विठ्ठल, अमीना, भानू राजोपाध्ये, सुरेश परदेशी, करमरकर, हावळ, क-हाडकर, सुरेखा
गीते :१) हा रविचंद्र धरणी समोर, २) प्रभू गान गाऊ आता, ३) आनंदे का नटला, ४) येता खडतर काळ जरासा, ५) अंबरी देखा हासत, ६) का मला न थारा, ७) का पटेना तुझी ईश्वर थोरवी.
कथासूत्र :अप्सरांची प्रमुख मोहिनी विदेशाचा राजा फुकमगंधा याचे शिस्त व विश्वास मोडून दाखवण्याचे आव्हान स्वीकारते.राजा मोहिनीवर मोहित होऊन राज्य व कुटुंबीय यांचा त्याग करण्यास सिद्ध होतो.युवराज गादीवर बसायचा असतो.त्याची मोठी चमत्कारिक अवस्था होते.कारण मोहिनीला दोन वर दिलेले असतात. एक तर राजानं राजपुत्राला ठार करायचं किंवा एकादशीला उपवास सोडायचा.
विशेष :राजकवी यशवंत यांनी चित्रपटासाठी कथा, पटकथा, संवाद आणि गीते प्रथम लिहीली. गांधी चित्रपटाची ऑस्कर विजेती भानू अथय्या (भानू ग्रामोपाध्ये) हिने या बोलपटांत काम केले होते.

सामायिक करा :

मोहिनी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती