लपंडाव
१९४०

सामाजिक
३५ मिमी/कृष्णधवल/११९९८ फूट/१३४मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २२५०१

निर्मिती संस्था :नवयुग चित्रपट लिमिटेड
निर्माता :बाबूराव पेंढारकर
दिग्दर्शक :के. नारायण काळे
कथा :आचार्य प्र.के.अत्रे
पटकथा :आचार्य प्र.के.अत्रे,
संवाद :आचार्य प्र.के.अत्रे,
संगीत :दादा चांदेकर
छायालेखन :पांडुरंग नाईक
गीतलेखन :आचार्य प्र.के.अत्रे,
कला :वाटेगांवकर
ध्वनिमुद्रक :गणपत भोळे
ध्वनिमुद्रिका :एच्.एम्.व्ही. रेकॉर्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :बाबूराव पेंढारकर, मा. विनायक, दादा साळवी, बापूराव पवार, वनमाला, मीनाक्षी
गीते :१) तू राघू मी मैना, २) प्रीतिचा भिकारी आला, ३) जीव सारे खेळती लपंडाव हा, ४) कळया फुले हीं, ५) प्रीति मिळेल का हो बाजारी, ६) तुजविण करमत मजला, मुशाफरी आम्हां प्यारी, ७) शोभिवंत फुलपात्रीं.
कथासूत्र :रावबहादूर आपल्या दोन कन्या साधना व सुलभा यांना विवाहबंधनापासून दूर ठेवतात.पण सुलभा चंदूकडे आकर्षित होते.तो एका मोटार ट्रेनिंग स्कूलचा संचालक असतो.इकडे एक बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर उल्हास साधनावर प्रेम करत असतो.पण ती त्याला प्रथम झिडकारते.शेवटी सर्व विवाहोत्सुक रावबहादूरांचं युक्तीनं मन पालटवतात.
विशेष :मराठी भाषेमधे पहिली पब्लिक लिमिटेड चित्रसंस्था नवयुग ही होय. वनमालेचे रूपेरी पडद्यावरील प्रथम आगमन

सामायिक करा :

लपंडाव - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती