अयोध्येची राणी
१९४०

पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/११४६५ फूट/१०८मिनिटे/प्रमाणपत्र क्र. २४५४६

निर्मिती संस्था :प्रगति पिक्चर्स
दिग्दर्शक :के.पी.भावे
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
कलाकार :मनोहर घटवाई, सदाशिव कुलकर्णी, सुरेश परदेश, आशालता, रोहिणी, सोनूबाई
गीते :१) कामुक कलिका गौर काया, २) वाहू का मी सुमनमाला, ३) पतित पावना चैन नच मना, ४) रघुवीरा ध्यास तुझा, ५) ना भासे दुःख सन्निध, ६) तुज शोधू कुठे रघुवीरा, ७) त्यागुनि तुला भजन का रामा.
कथासूत्र :दशरथ राजाने कैकेयीला दिलेल्या वचनाप्रमाणे राम चौदा वर्षे वनवास पत्करतो.राज्यपद भरताकडे येते.पण आपल्यासाठी आपल्या गैरहजेरीत मातेनं केलेलं हे कारस्थान भरताला मुळीच रुचत नाही.तो राज्यावर तर बसत नाहीच,उलट रामाचा शोध घेण्यासाठी वनात जातो.राम त्याची समजूत घालून त्याला परत पाठवतो.रामाची आज्ञा म्हणून भरत राज्यकारभार पाहू लागतो,पण रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून!
विशेष :प्रस्तुत चित्रपट १९४१ साली ‘‘अयोध्येची राणी अर्थात भरत भेट” या नावाने पुन्हा एकदा सेन्सॉर झाला.

सामायिक करा :

अयोध्येची राणी - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती