निर्मिती संस्था :सरस्वती सिनेटोन
दिग्दर्शक :मा. विठ्ठल
कथा :मो. ग.रांगणेकर
पटकथा :मो. ग.रांगणेकर
संवाद :मो. ग.रांगणेकर
संगीत :अण्णासाहेब माईणकर
छायालेखन :एस्.डी.पाटील
देखरेख :दादासाहेब तोरणे व के.पी.भावे
ध्वनिमुद्रक :दादासाहेब तोरण
निर्मिती स्थळ :पुणे
कलाकार :शाहू मोडक, दादा साळवी, वसंतराव पहेलवान, जावडेकर, पंडित, चंदाबाई, सुंदराबाई, नकलाकार घोडके
गीते :१) देवा शोधू कुठे दिना, २) थोर कुणी हिन कुणी, ३) अती आपदा जीव भंगला, ४) हाय! सविता लोपलासे, ५) वद साहसी सुखा, ६) भोग कसा हा जीवाचा, ७) हा विलास, निरास मानूं, ८) कुणा कथूं मी व्यथा मनीच्या, ९) येत उदयीं भाग्य साचे, १०) थाट बघुनि माझा, ११) मनी होवू सुख
कथासूत्र :भोल्या हा भीक मागून पोट भरणारा एक मुलगा.पण भरतगिरी राज्याच्या राजपुत्राला भोल्याच्या या मुक्त आयुष्याची ओढ वाटू लागते.म्हणून तो आणि भोल्या एकमेकांच्या आयुष्याची अदलाबदल करतात.भिकारी भोल्या राजपुत्राचा वेष घेतो तर राजपुत्र भिकारी होतो.पण दोनच दिवसांनी राजपुत्राला राज्याभिषेक होणार असल्याने लगेच दोनच दिवसात ते आपापले मूळ वेष धारण करतात.तरीही या दोन दिवसांमध्ये दोघांनाही या नव्या भूमिकांमुळे अनेक गमतीशीर अनुभव येतात व दोघंही या औट घटकेचा राज्याची पुरेपूर मजा लुटतात.
विशेष :मराठी चित्रपटातला पहिला डबल रोल शाहू मोडक यांनी केला. (भोला आणि राजपुत्र) तर दिग्दर्शक मा. विठ्ठल यांनी भारतातील पहिला डबल रोल ‘‘राजतरंग” (१९२८) या मूकपटातून केला होता. सरस्वतीच्या ‘औट घटकेचा राजा’ ची हिन्दी आवृत्ती ‘‘आवारा शहजादा” (Vagebond Prince) नावाने दाखविण्यांत येत असे.