अष्टविनायक
१९७९

सामाजिक
३५ मिमी/रंगीत/११५मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी८९४३७/९-२-१९७९./यू

निर्मिती संस्था :मनोरमा फिल्म्स
निर्माता :शरद पिळगांवकर
दिग्दर्शक :राजदत्त
कथा :मनोरमा फिल्म्स कथा विभाग
पटकथा :मनोरमा फिल्म्स कथा विभाग
संवाद :मनोरमा फिल्म्स कथा विभाग
संगीत :अनिल अरुण
छायालेखन :गिरीश कर्वे
संकलक :तेलंगगुप्ते
गीतलेखन :शांता शेळके, शांताराम नांदगावकर, जगदिश खेबुडकर, मधुसूदन कालेलकर
कला :शरद पोळ
रंगभूषा :मोहन पाठारे
वेषभूषा :विठ्ठल इंगवले, नर्मदा मोरे, चांदबीबी
स्थिरचित्रण :मयुर वैष्णव
गीत मुद्रण :कौशीक, डि. ओ. भन्साळी, रौबिन चटर्जी
ध्वनिमुद्रक :रामनाथ जठार
ध्वनिमुद्रिका :एच्. एम्. व्ही. रेकार्ड कंपनी, मुंबई
निर्मिती स्थळ :जयप्रभा स्टुडिओ, शांताकिरण स्टुडिओ, कोल्हापूर
रसायन शाळा :पी. जो. मुळ्ये, के. व्ही. कुळकर्णी, बॉम्बे फिल्म लॅबोरेटरीज
कलाकार :सचिन, वंदना पंडित, चंद्रकांत, पद्मा चव्हाण, राजा गोसावी, शरद तळवलकर, डॉ. वसंतराव देशपांडे, रमेश भाटकर, शमा गोसावी, लता थत्ते, सरोज सुखटणकर, माधव आचवल, सुहास भालेकर, बी.माजनाळकर, पांडुरंग बेणारे, उषा चव्हाण, रविंद्र महाजनी, अशोक सराफ, शाहू मोडक, सूर्यकांत, कृष्णकांत दळवी, सुधीर दळवी,आशा काळे, जयश्री गडकर
पार्श्वगायक :अनुराधा पौडवाल, जयवंत कुलकर्णी, मल्लेश, चंद्रशेखर गाडगीळ, शरद जांभेकर, डॉ. वसंतराव देशपांडे
गीते :१) तू सुखकर्ता तू दुखहर्ता, २) प्रथम तुला वंदितो कृपाळा, ३) दिसते मजला सुखचित्र नवे, ४) दाटुनि कंठ येतो ओठात येई गाणे, ५) आली माझ्या घरी ही दिवाळी, ६) अष्टविनायका तुझा महिमा कसा

कथासूत्र :माणसाची कुठेतरी श्रद्धा असली पाहिजे म्हणजेच त्याची कार्यसिद्धी होते,हे सूत्र.गजानन पेपर मिल्सचे संचालक नानासाहेब इनामदार श्रीगजाननाचे भक्त. पण त्यांचा मुलगा बाळासाहेब परदेशात शिकलेला नवमतवादी.तो जेव्हा मिलचा कारभार पाहू लागतो तेव्हा तो कारभारात नवे तंत्र वापरतो. घरच्या व कामगारांच्या देवावरील श्रद्धेचा त्याला तिटकारा असतो.तो पक्का नास्तिक.त्याचवेळेला मिलवर मोठे संकट येते.त्याचे एकेकाळचे गुरुजी आणि मिलचे कर्मचारी साठे गुरुजी त्याला गणपतीचे देऊळ बांधून अष्टविनायकाची यात्रा करायला सुचवतात.त्याची पत्नी वीणा आस्तिक असते.यानंतर मिल पुन्हा व्यवस्थित चालू लागते.
विशेष :अभिनेत्री वंदना पंडित यानी अभिनीत केलेला पहिला चित्रपट.

सामायिक करा :

अधिक माहिती