ग्यानबाची मेख
१९७९

सामाजिक
३५ मिमी/रंगीत/१२४मिनिटे/प्रमाणपत्र क्र.बी४५७१/१२-१०-१९७९./ए

निर्मिती संस्था :श्री विश्वकुमार फिल्म्स
निर्माता :अशोक पेंटर
दिग्दर्शक :वसंत पेंटर
कथा :वसंत पेंटर
पटकथा :वसंत पेंटर, आय. बारगीर
संवाद :दिनकर द. पाटील
संगीत :दिनकर लक्ष्मण
छायालेखन :आय बारगीर
गीतलेखन :कवि संजीव
कला :अशोक पेंटर
रंगभूषा :बाबूराव ऐतवडेकर
वेषभूषा :पी. खटावकर
नृत्य दिगदर्शक :सुबल सरकार, सौ. मंगला बेतळेकर
स्थिरचित्रण :चिमासाहेब घोरपडे
विशेष चित्रण :डाह्याभाई पटेल
निर्मिती स्थळ :शांतकिरण,जयप्रभा स्टुडिओज, कोल्हापूर
कलाकार :अशोक सराफ, अस्वले गुरुजी, आशा पाटील, गणपत पाटील, ज्योति चांदेकर, दिनेश साखरे, दीनानाथ टाकळकर, दीनानाथ वायकुळ, धुमाळ, मधू आपटे, रंजना, रविंद्र महाजनी, वत्सला देशमुख
पार्श्वगायक :उषा मंगेशकर, सुमन कल्याणपूर, जयवंत कुलकर्णी, महेंद्र कपूर, पुष्पा पागधरे
गीते :१) माणसा अरी माणसा, २) निळ्या नभी जा छुम छुम छननन, ३) फाकडी लालडी आली कैरीला, ४) हात मेंदिचा रंग माझा गोरा, ५) ही धरती आभाळ सोबतीस, ५) फुलावे जळावे जळावे फुलावे, ६) अर कोरड्यास असं करनारा, ७) आली आली आली माटकवाली आली
कथासूत्र :सुबरावचा मुलगा रंगरावला त्याच्या बापानं तमाशा कलावती वैजयंता हिला पैशांची मदत करावी असं वाटत नाही.वैजयंता एकदा ग्यानबाला मृदुंग वाजवताना ऐकते आणि त्याला तमाशात येण्याबद्दल आग्रह करते.त्याला कर्जफेडीला ती मदत करते.त्यामुळे तो तिची विनंती मान्य करतो.वैजयंता ग्यानबाच्या प्रेमात पडते. सुबराव आणि रंगराव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे राहतात.ग्यानबाच्या मदतीनं रंगराव निवडून येतो.या निकालाने चिडून जाऊन रंगरावाची वाग्दत्त वधू गौरा हिच्याशी लग्न लावायच्या तयारीत सुबराव असतो.पण ते त्याला साध्य होत नाही.रंगराव-गौरा व ग्यानबा-वैजयंती यांची लग्नं होतात व सुबराव वानप्रस्थाश्रम स्वीकारतो.

सामायिक करा :

ग्यानबाची मेख - मराठी चित्रपट सूची

अधिक माहिती